मातोश्री ट्रस्टचा रत्नागिरी जिल्हा परिषद प्रशासनास देखील एक हात मदतीचा !!
मुंबई, (समीर खाडिलकर/शांत्ताराम गुडेकर) : पूरग्रस्त महाड, चिपळूणात सर्वोतोपरी मदत कार्या करत असलेल्या "मातोश्री ट्रस्टचे सर्वोसर्वा मनसे कामगार सेना अध्यक्ष डॉ.मनोज चव्हाण" यांना ट्रस्टतर्फे आरोग्य शिबिरे सुरु असताना माहिती मिळाली कि पूरग्रस्त भागामध्ये *टि टि च्या इंजेक्शनची* गरज आहे. म्हणून त्यांनी "ट्रस्टचे रत्नागिरी अध्यक्ष अरविंद मालाडकर" यांच्या करवी जिल्हा आरोग्य प्रशासनास संपर्क केला असता त्यांना असे कळाले कि आरोग्य विभागाकडे त्या इंजेक्शनची कमतरता आहे. लागलीच त्यांनी "लायन्स क्लब ऑफ ईस्ट बॉम्बे चे श्रीधर जगताप" व मातोश्री सेवाधाम आरोग्य सेवाट्रस्ट यांच्या तर्फे ५००० टि टि ची इंजेक्शनस उपलब्ध करून दिली. सोबतच ५००० सिरिंज सुद्धा उपलब्ध केली. सदर इंजेक्शनस व सिरिंज "जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी इंदुराणी जाखड" यांच्या प्रमुख उपस्थितीत "जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये" यांना सुपूर्द केली. जि प मुख्याधिकारीनी लायन्स क्लब ऑफ़ ईस्ट बॉम्बे व मातोश्री सेवाधाम आरोग्य सेवा ट्रस्टचे विशेष आभार मानले. तसेच मातोश्री ट्रस्टतर्फे पूरग्रस्त चिपळूण भागात सुरु असलेल्या मदत कार्याबद्दलही विशेष कौतुक करून आभार मानले.
याप्रसंगी अधिकारी जाखड मॅडम डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांचे सह मातोश्री ट्रस्टचे "प्रमुख विश्वस्त डॉ. मनोज भाऊ चव्हाण", "विश्वस्त संदीप परब", ट्रस्टचे रत्नागिरी जिल्हाअध्यक्ष अरविंद मालाडकर, जिल्हाचिटणीस बिपिन शिंदे इत्यादी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment