*वाढदिवस अभिष्टचिंतन विशेष...!*
*६३ व्या वर्षात देखील कोकणची लोककला जतन करणारे कलातपस्वी नेतृत्व - शाहिर शांताराम गावणंग !*
*तळहाताच्या नाजूक रेषा*
*कुणी वाचाव्या,कुणी पुसाव्या*
*तांबूस निर्मल,नखांवरी अन*
*शुभ्र चांदण्या कुणी गोंदाव्या"*
प्रस्तुत ओळी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी बा.सी.मर्ढेकर यांच्या कवितेतील असून शब्द वर्णन अगदी भाव रम्य आहे.भूतलावर प्रत्येक व्यक्तीच्या अंगी आज विविध कला अवगत असतात.जसा चित्रकाराचा अनुभव रंगामधून,लेखकाचा अनुभव शब्दांतुन,कवीचा अनुभव काव्यातुन तसा गायकाचा अनुभव हा सुरांमधून व्यक्त होत असतो.
वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षापासून,सर्वसामान्य परिस्थितीतून गायन क्षेत्रात पदार्पण केलेल्या गुहागर तालुक्यातील मु.विसापूर (दुसरी वाडी) ता.गुहागर, जि. रत्नागिरी या गावी जन्मलेले अनमोल रत्न म्हणजे शांताराम धोंडू गावणंग होय.घरची गरिबी, यातून आपलं शालेय शिक्षण इयत्ता ७ वी. उत्तीर्ण होऊन कौटुंबिक उदरनिर्वाह करिता मुंबईत आले. लहानपणीच अंगी दडलेली नाच, गायनाची कला इथूनच त्यांनी कलेच्या प्रवासाला सुरुवात केली. प्रथम त्यांना गाव-वाडी येथील कार्यक्रमात भजन करण्याची गोडी होती. त्यांनी गोविंद बाळू बुवांना आपले गुरुवर्य मानत या कलेत त्यांनी गायनाला सुरुवात करत आपलं नाव प्रसिद्धीस आणलं. तद्नंतर कोकणची जाखडी नृत्य (शक्ती-तुरा) या लोककलेत सहकारी रमेश आगरे आणि सहकारी मंडळी यांना सोबतीला घेऊन पदार्पण केले. भानुदास घराण्याचे शिष्यत्व पत्करत नारायणजी चापडे यांनी गुरू स्थानी मानत कृष्णा-अर्जुन यांना वस्तादपदी नेमले व कलेत आपलं सादरीकरण करण्यास जोमानं सुरुवात केली.
शाहिर शांताराम गावणंग यांचा आज जन्मदिवस होय. ६३ व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या या महान कलातपस्वी शाहिराने आजवर या लोककलेच प्रामाणिकपणे जतन-संवर्धन केले आहे. शाहिरी, गायना सोबत सामाजिक कार्यातील त्यांचं योगदान देखील अतुलनीय आहे.त्यांनी शिव गर्जना मित्र मंडळाची स्थापना करत या मंडळाच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवत आहेत. त्यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून प्रथमच आपल्या आवाजातील गणरायाची महती सांगणारे गीत ध्वनिमुद्रण केले आहे आणि हे गाणं आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने युट्युब वरती प्रसारित होणार आहे. कोव्हिड - १९ सारख्या भिषण संकटात देखील आपली कला लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी तळमळीने काम करणारे हे व्यक्तिमत्त्व होय. त्यांच्या आवाजातील गोडवा, गायनातील माधुर्य जरी साठी पार झाली तरी तसाच आहे.
*आपलं निम्मं आयुष्य या रसिक प्रेक्षकांच्या सेवेसाठी अर्पण करणाऱ्या कोकणच्या या कलातपस्वी शाहिराला वाढदिवसाच्या व पुढील वाटचालीस यशदायी शुभेच्छा !*
✍🏻 *शब्दांकन*
*कु : दिपक धोंडू कारकर* ( मुर्तवडे,कातळवाडी - चिपळूण ) भ्रमणध्वनी - ९९३०५८५१५३
No comments:
Post a Comment