Monday, 3 March 2025

खेरशेत बेंडलवाडी तर्फे स्टार प्रवाह वाहिनीवर झळकलेल्या कु. अनन्या खेराडे हिचा सत्कार !!

खेरशेत बेंडलवाडी तर्फे स्टार प्रवाह वाहिनीवर झळकलेल्या कु. अनन्या खेराडे हिचा सत्कार !!

प्रतिनिधी - निलेश कोकमकर 

   चिपळूण तालुक्यातील खेरशेत येथील श्री केदारेश्वर मित्र मंडळ खेरशेत बेंडलवाडी मार्फत दरवर्षी अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रम राबविले जातात. अनुषंगाने २०२५ साली देखील श्री केदारेश्वर मित्र मंडळ तर्फे महाशिवरात्री महोत्सव निम्मित विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्या निमित्त चिपळूण तालुक्यातील आबीटगाव मधील सुकन्या स्टार प्रवाह मी होणार सुपरस्टार पर्व ३ मध्ये झळकलेली आणि चिपळूण तालुका आणि रत्नागिरी जिल्हाचे नाव उंच पदावर नेहणारी बाल कलाकार तसेच तळागाळातील आणि ग्रामीण भागातील नवोदित कलाकार आणि यशाचे शिखर गाठणारे विद्यार्थी तयार व्हावेत आणि यशस्वी व्हावेत असे शुभाशीर्वाद देत  कु. अनन्या विजय खेराडे हिचा सत्कार श्री केदारेश्वर मित्र मंडळाचे आधारस्थंभ मारुती बेंडल यांच्या हस्ते करण्यात आला. ह्या वेळी सन्मान चिन्ह देताना बारकू बेंडल सह युवा अध्यक्ष सुभाष बेंडल सचिव हरिश्चंद्र शिगवण, गणपत बेंडल, राजेंद्र बेंडल दत्ताराम बेंडल, बाब्या बेंडल, प्रदीप जाधव, चंद्रकांत जाधव, अनंत बेंडल सह मंडळाचे सर्व सभासद उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

खेरशेत बेंडलवाडी तर्फे स्टार प्रवाह वाहिनीवर झळकलेल्या कु. अनन्या खेराडे हिचा सत्कार !!

खेरशेत बेंडलवाडी तर्फे स्टार प्रवाह वाहिनीवर झळकलेल्या कु. अनन्या खेराडे हिचा सत्कार !! प्रतिनिधी - निलेश कोकमकर     चिपळूण तालु...