Sunday, 2 March 2025

डॉ.भारती बावदाने व शिवसेना विधानसभाप्रमुख डॉ.सुबोध बावदाने यांच्या वतीने कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले यांचा सत्कार सोहळा संपन्न ; आशीर्वाद युवा मंडळाच्या शेडचे उद्धाटन !

डॉ.भारती बावदाने व शिवसेना विधानसभाप्रमुख डॉ.सुबोध बावदाने यांच्या वतीने कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले यांचा सत्कार सोहळा संपन्न ; आशीर्वाद युवा मंडळाच्या शेडचे उद्धाटन !

**हनुमान नगर मधील प्रलंबित एसआरए प्रकल्पाचे काम मार्गी लावण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार - मंत्री भरतशेठ गोगावले

विक्रोळी, (केतन भोज) : पश्चिम येथील शिवसेना प्रभाग क्रमांक १२३ च्या माजी नगरसेविका डॉ.भारती बावदाने व शिवसेना विधानसभाप्रमुख डॉ.सुबोध बावदाने यांच्या वतीने महाड - पोलादपूर विधानसभा मतदार संघातून सलग चार वेळा आमदार म्हणून निवडून आलेले कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले यांचा जाहिर सत्कार सोहळा आशीर्वाद युवा मंडळ, आशीर्वाद सोसायटी, हनुमान, विक्रोळी पार्कसाईट याठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडला. आशीर्वाद युवा मंडळ, आशीर्वाद सोसायटी, हनुमान नगर येथील डॉ.भारती बावदाने व शिवसेना विधानसभाप्रमुख डॉ.सुबोध बावदाने यांच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या भव्य शेडचे उद्घाटन मंत्री भरतशेठ गोगावले, शिवसेना ज्येष्ठ नेत्या मीनाताई कांबळी व शिवसेना प्रवक्त्या तथा सचिव शितल म्हात्रे यांच्या शुभहस्ते पार पडले. तसेच विभागातील सर्व लाडक्या बहिणींसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचे देखील आयोजन यावेळी करण्यात आले होते. या कार्यक्रमाला लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. शिवसेना नेत्या मीनाताई कांबळी तसेच प्रवक्त्या तथा सचिव शितल म्हात्रे यांनी उपस्थित सर्व लाडक्या बहिणींसोबत संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केले.

        विक्रोळी पश्चिम हनुमान नगर येथील प्रलंबित एसआरए प्रकल्पाचे काम मार्गी लावण्यासाठी लवकरच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच याबाबत योग्यतो पाठपुरावा करून सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी मंत्री भरतशेठ गोगावले यांनी सांगितले. भरतशेठ गोगावले हे महाड - पोलादपूर विधानसभेचे आमदार आहेत. तसेच प्रभाग क्रमांक १२३ मध्ये महाड - पोलादपूर वासिय यांची संख्या अधिक असल्यामुळे तेही या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते. तरी येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत डॉ. भारती बावदाने यांना प्रचंड मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. असे मंत्री भरतशेठ गोगावले यांनी उपस्थितांना सांगितले.

No comments:

Post a Comment

खेरशेत बेंडलवाडी तर्फे स्टार प्रवाह वाहिनीवर झळकलेल्या कु. अनन्या खेराडे हिचा सत्कार !!

खेरशेत बेंडलवाडी तर्फे स्टार प्रवाह वाहिनीवर झळकलेल्या कु. अनन्या खेराडे हिचा सत्कार !! प्रतिनिधी - निलेश कोकमकर     चिपळूण तालु...