महाराष्ट्र भूषण डॉ. श्री. नानासाहेब तथा नारायण विष्णू धर्माधिकारी यांच्या जन्मदिनानिमित्त डोंबिवलीत स्वच्छता अभियान !
मुंबई, (शांताराम गुडेकर) :
महाराष्ट्र भूषण डॉ. श्री. नानासाहेब तथा नारायण विष्णू धर्माधिकारी यांच्या जन्मदिनानिमित्त महाराष्ट्र राज्याचे माननीय राज्यपाल यांचेकडून 'स्वच्छतादूत म्हणून सन्मानित डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्षा पद्मश्री श्री दत्तात्रेय नारायण धर्माधिकारी व डॉ. श्री. सचिनदादा दत्तात्रेय धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता अभियान रविवार दिनांक ०२ मार्च २०२५ रोजी डोंबिवली शहर व परिसर येथे पार पडले.
हे प्रतिष्ठान स्वच्छता अभियानासारख्या जनजागृती उपक्रमाबरोबर एकूण ४६ प्रकारचे विविध सामाजिक उपक्रम जसे वृक्ष लागवड व संवर्धन, जल पुनर्भरण, आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, कॅन्सर अवेअरनेस, प्लाजमा डोनेशन, निर्माल्य संकलन आणि खत निर्मिती इत्यादी उपक्रम राबविते.या प्रतिष्ठानाचे कार्य केवळ भारतातच नव्हे तर भारताबाहेरील अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, सिंगापुर, कतार, दुबई या राष्ट्रांमध्येही राबवले जाते.
८ ऑक्टोबर १९४३ पासून डॉ. श्री. नानासाहेब यांनी श्रीबैठका सुरू केल्या. तेव्हापासून आजतागायत या बैठकांच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य अविरत सुरू आहे. अंधश्रदधा निर्मुलन, व्यसनमुक्तता आदी कार्यांबरोबर समाजातील सर्व स्तरातील स्त्री, पुरूषांना बैठकीच्या तसेच लहान मुलांना बालसंस्कार मार्गदर्शन वर्ग यांच्या माध्यमातून मानवी नितीमुल्यांची जोपासना कशी करावी याची शिकवण देण्याचे कार्य आज ८२ वर्षे निष्काम भूमिकेतून सुरू आहे.
डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा ता. अलिबाग जि. रायगड तर्फे आयोजित स्वच्छता अभियानात एकूण २९६५ श्रीसदस्यांनी सहभाग घेतला. ओला व सुका कचरा मिळून एकूण २९ टन घनकचरा उचलण्यात आला. एकूण ९६ किलोमीटर रस्ते सफाई करण्यात आली. हे स्वच्छता अभियान फक्त डोंबिवली शहर विभागापुरतेच नसून संपूर्ण महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील राज्यांमधूनही पार पडले. मानवी आरोग्यासाठी जशी शुद्ध हवा, शुद्ध पाणी हवे असते, तसेच पर्यावरणाचे होणारे प्रदूषण याची जाणीव सर्वसामान्यांना होणे तसेच अस्वच्छतेमुळे अनेक प्रकारचे आजार व साथीचे रोग पसरतात व त्यासाठी औषधोपचार मोठ्या प्रमाणात खर्च करणे भाग पडते, काही वेळेस जीवित हानी सुद्धा होते याबाबतची जनजागृती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणे या हेतूने या स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.
No comments:
Post a Comment