पोलिसांनी जेवणाच्या ताटावरूनच नारायण राणेंना केली अटक, मुंबईत शिवसैनिकांनी फोडले फटाके.!
भिवंडी, दिं,24, अरुण पाटील (कोपर) :
नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातील वादाचा नवा अंक आज पाहण्यास मिळाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात अरेरावीची भाषा करणे राणे यांना चांगलेच भोवले आहे. पोलिसांनी जेवणाच्या ताटावरून नारायण राणेंना अटक केली आहे. राणेंना अटक होताच मुंबईतील कुलाब्यात शिवसैनिकांनी जोरदार फटाके फोडून एकच जल्लोष केला आहे.
केंद्रात मंत्रिपद मिळाल्यानंतर नारायण राणे यांनी शिवसेनेला अंगावर घेतले आणि जोरदार टीकास्त्र सोडले. पण, रायगडमध्ये पत्रकारांशी बोलत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अरेरावीची भाषा वापरल्यामुळे राणे यांना चांगलेच महागात पडले. पोलिसांनी नारायण राणे यांना अटक केली आहे.नारायण राणे यांना अटक केल्यानंतर शिवसैनिकांनी एकच जल्लोष साजरा केला. मुंबईतील कुलाबा परिसरातील शिवसेना शाखेसमोर शिवसैनिकांनी जोरदार फटाके फोडून राणेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
आज सकाळपासून ठिकठिकाणी शिवसैनिकांनी भाजपच्या कार्यालयांवर जोरदार हल्ला चढवला होता. मुंबई, ठाण्यात, पुणे, नाशिक, सिंधुदुर्गात शिव सैनिकांनी भाजपविरोधात जोरदार राडा घातला. दरम्यान, गोळवली येथील रा.स्व. संघाच्या सेवा प्रकल्पाची पाहाणी करत असताना रत्नागिरी पोलिसांनी नारायण राणे यांना ताब्यात घेतले. राणे आपल्या दोन्ही मुलं आणि आमदार प्रसाद लाड यांच्या सोबत बंद खोलीत बसून जेवण करत होते. पोलीसांचा मोठा फौजफाटा बाहेर उभा होता.
पोलीस अधिक्षकांनी राणेंना सोबत येण्याची विनंती केली, पण जेव्हा आतमध्ये मोठा गोंधळ उडाला. निलेश राणे यांनी पोलिसांना तुमच्याकडे अटक वॉरंट आहे का असं म्हणत हुज्जत घातली, त्यावेळी राणे जेवत असताना उठले. त्यानंतर राणेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं.अटकेनंतर नारायण राणे यांचं ब्लड प्रेशर आणि शुगर वाढली आहे. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात यावं असा सल्ला डॅाक्टरांनी पोलीस अधिक्षक यांना दिला आहे.
No comments:
Post a Comment