Tuesday, 3 August 2021

ॐ सुर्योदय मंडळ(रजि.) तर्फे महाड- चिपळूण येथील पूरग्रस्तांना मदतीचा हात !

ॐ सुर्योदय मंडळ(रजि.) तर्फे महाड- चिपळूण येथील पूरग्रस्तांना मदतीचा हात !


मुंबई, (शांत्ताराम गुडेकर) :

        विक्रोळी पार्क साईट,मुंबई-७९ या विभागातील सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या ॐ सुर्योदय मंडळ(रजि.) तर्फे महाड-चिपळून गाव-पेटमाप  ता.चिपळूण, शंकर वाडी, खताते वाडी, भुरण वाडी  ता. चिपळूण येथे आपले कर्तव्य समजून पूरग्रस्तांना विविध साहित्यासह गृहपयोगी साहित्याचे वाटप  मंडळ पदाधिकारी, सदस्य व हितचिंतक यांच्याहस्ते करण्यात आले.सिध्दीविनायक मित्र मंडळ, विजय क्रिडा मंडळ, सम्राट अशोक मंडळ, जय हनुमान व्यायाम मंदिर, राहूल नगर व हनुमान नगर आदींसह मदत देणाऱ्या सर्व दानशुर व्यक्ती, संस्था, विभागातील मंडळ यांचे ॐ सुर्योदय मंडळतर्फे आभार व्यक्त करण्यात आले. सुयश संतोष जोगले, शिवांश विनोद सावंत, अर्णव मंगेश सावंत या बाल मदतवीरांचे विशेष कौतुकही करण्यात आले. सुरेश पेजे, दशरथ पंडित, दत्ताराम कोलापटे, वामन जोगले, संतोष जोगले, प्रविण लाड, संजय कात्रट, विनोद पंडित, संतोष पचकुडे, जालिंदर भोसले, सुरेश कोलापटे, राजेश कदम, महेंद्र नामे यांच्यासह मंडळ पदाधिकारी, सदस्य व सभासद,हितचिंतक यांनी या कार्यासाठी विशेष परिश्रम  घेतले.

No comments:

Post a Comment

६३ वा नागरी संरक्षण व होमगार्ड्स संयुक्त वर्धापन दिन (सप्ताह) सांगता समारोप एचिव्हर्स कॉलेज, कल्याण येथे उत्साहात !!!

६३ वा नागरी संरक्षण व होमगार्ड्स संयुक्त वर्धापन दिन (सप्ताह) सांगता समारोप एचिव्हर्स कॉलेज, कल्याण येथे उत्साहात !!! कल्याण प्र...