Monday, 16 August 2021

जेएनपीटीमध्ये ७५ वा भारतीय स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा.. "स्वातंत्र्य सेनानी व कोविड योद्ध्यांना दिली मानवंदना"..

जेएनपीटीमध्ये ७५ वा भारतीय स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा..
"स्वातंत्र्य सेनानी व कोविड योद्ध्यांना दिली मानवंदना"..


मुंबई, उमेश जाधव -: भारतातील प्रमुख कंटेनर पोर्ट असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) येथे ७५ वा भारतीय स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यावेळी कोरोना प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करण्यात आले. प्रमुख पाहुणे व जेएनपीटीचे उपाध्यक्ष उन्मेश शरद वाघ, भा.रा.से. यांनी प्रशासन भवन येथे ध्वजवंदन केले. यावेळी पोर्टचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित अंतर राखणे, मास्क घालणे, सॅनिटायाजेशन करणे व गर्दी टाळणे यासारख्या सर्व प्रतिबंधात्मक उपायांचे पालन करून भारतीय स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. कोरोना महामारीच्या काळातही बंदराचे कार्य अविरतपणे चालू ठेवून देशातील पुरवठा साखळी सुरु ठेवण्यास मदत करणाऱ्या कोरोना योद्ध्यांचे यावेळी विशेष अभिनंदन करण्यात आले.


स्वातंत्र्य दिन समारंभात जेएनपीटीचे उपाध्यक्ष  उन्मेश शरद वाघ, भा.रा.से. म्हणाले की, “आज आपण या आपल्या देशाचा ७५ वा स्वातंत्र्यदिन साजरा करीत आहोत. लोकशाही मूल्यांचे जतन करीत देशाच्या आर्थिक विकासामध्ये योगदान देत असल्याचा जेएनपीटीला सार्थ अभिमान आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला आकार देण्यात जेएनपीटीची भूमिका महत्वाची राहिली आहे व आम्हाला याचा अभिमान आहे. या महान प्रसंगी, एक सशक्त भारत घडवण्यासाठी ज्यांनी-ज्यांनी विशेष योगदान दिले आहे, त्या प्रत्येकास सलाम. आमचे भागधारक, आयात-निर्यात समुदाय व आमचे मूल्यवान कर्मचारी यांनी देखील बंदराचे काम निरंतर चालू ठेवण्यासाठी कठोर परिश्रम घेतले आहेत व देशाच्या सागरी व्यापारामध्ये वाढ करण्यामध्ये लक्षणीय योगदान दिले आहे त्यांचेही आभार.”

अमृत महोत्सवी भारतीय स्वातंत्र्य दिन देशाचा गौरवशाली इतिहास, संस्कृती व प्रगतीचे स्मरण करून साजरा करण्यासाठी भारत सरकारने  'आझादी का अमृत महोत्सव' उपक्रम सुरु केला आहे. जेएनपीटीने या उपक्रमांतर्गत  विविध स्पर्धांचे, कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. जेएनपीटीचे उपाध्यक्ष उन्मेष शरद वाघ, भा.रा.से. यांनी पोर्टचे सर्व कर्मचारी व भागधारकांना अमृत महोत्सवी भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.


जेएनपीटीविषयी :
जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) हा नवी मुंबई येथील भारतातील सर्वात मोठे कंटेनर हाताळणीचे बंदर आहे. 26 मे 1989 मध्ये या बंदराची स्थापना झाली असून कामकाजाच्या तीनपेक्षा कमी दशकांत जेएनपीटी हे देशातील बल्क-कार्गो टर्मिनलवरून प्रीमियर कंटेनर पोर्ट म्हणून नावारूपाला आले. 

सध्या जेएनपीटी येथे पाच कंटेनर टर्मिनल्स कार्यरत आहेत. ज्यामध्ये जवाहरलाल नेहरू पोर्ट कंटेनर टर्मिनल (जेएनपीसीटी), न्हावा शेवा इंटरनॅशनल कंटेनर टर्मिनल (एनएसआयसीटी),  गेटवे टर्मिनल्स इंडिया प्रा. लि. (जीटीआयपीएल), न्हावा शेवा इंटरनॅशनल गेटवे टर्मिनल (एनएसआयजीटी) आणि नव्याने स्थापन करण्यात आलेल्या भारत मुंबई कंटेनर टर्मिनल्स प्रायव्हेट लिमिटेड (बीएमसीटीपीएल) चा समावेश आहे. या बंदरात सर्वसाधारण कार्गोकरिता शॅलो वॉटर बर्थ आणि आणखी एक लिक्विड कार्गो टर्मिनल आहे, ज्याचे व्यवस्थापन बीपीसीएल-आयओसीएल कन्सोर्टीयमद्वारे चालते.

No comments:

Post a Comment

स्फूर्ती फाउंडेशन माध्यमातून आधारकार्ड नोंदणी शिबीर संपन्न !

स्फूर्ती फाउंडेशन माध्यमातून आधारकार्ड नोंदणी शिबीर संपन्न ! **शिबिरात आधारकार्ड नोंदणी व अद्यायावत करण्यासाठी नागरीकांची गर्दी **तसेच ब प्र...