टिटवाळा येथे सात वर्षीय चिमुकलीवर सावत्र बापाचा बलात्कार !
'तालुका पोलिस ठाण्यात नराधम बापा विरोधात गुन्हा दाखल'
टिटवाळा, उमेश जाधव -: कल्याण तालुका ग्रामीण पोलीस स्टेशन (टिटवाळा) च्या हद्दीत एका सात वर्षीय चिमुकलीवर तिच्या सावत्र बापाने स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी बलात्कार केल्याची धक्कादायक आणि नात्याला काळीमा फासणारी संतापजनक घटना घडली आहे.
संपूर्ण भारत देश देशाचा ७५ वा अमृतमहोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करीत असताना टिटवाळा पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक सात वर्षीय चिमुकली मात्र बापाच्या अत्याचारातून सुटली नाही. मूळची उत्तर प्रदेश येथे राहणारी सविता नाव बदललेले आहे (वय २५ वर्ष ) टिटवाळा येथे एक वर्षापासून फरशी बसविण्याचे काम करणाऱ्या शेषराव गौतम (भारती) (वय २६ वर्ष) याच्यासोबत राहत आहे. तिला पहिल्या पतीपासून एक मुलगी (सात वर्ष) आणि एक मुलगा (१ वर्ष) अपत्य आहेत.
१५ ऑगस्ट रोजी सविता आणि शेषराव यांच्यामध्ये कडाक्याचे भांडण झाले या भांडणाची तक्रार देण्याकरिता सवीता ही टिटवाळा पोलीस ठाण्यात गेली. तिला घरी यायला संध्याकाळचे चार वाजले, घरी आल्याबरोबर तिची सात वर्षाची मुलगी रडत होती. रडत असलेल्या आपल्या मुलीला काय झाले असे विचारले असता मुलगी अधिक रडू लागली यावेळी तेथे उपस्थित असलेला शेषरावला सविताने ही मुलगी का रडत आहे असे विचारले असता, शेषरावने मुलगी सायकल वरून पडली आहे म्हणून ती रडत आहे असे सांगितले.
आईने रडत असलेल्या आपल्या मुलीला दवाखान्यात घेऊन गेली असता डॉक्टरांनी तिची तपासणी करून तिला उपचाराकरिता मोठ्या दवाखान्यात घेऊन जाण्यास सांगितले. सविताने आपल्या चिमुकलीला घेऊन उल्हासनगर येथे रुग्णालयात गेली. डॉक्टरांनी मुलीला तपासून काय झाले असे विचारले असता मुलीने रडत रडत तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. मुलीच्या जबानी वरून डॉक्टरांना बलात्काराचा संशय आल्याने डॉक्टरांनी पोलिसांना बोलावून घेतले. आईला सत्य परिस्थिती सांगितली आई सविताने शेषराव गौतम (भारती) विरोधात कल्याण तालुका पोलीस स्टेशन टिटवाळा येथे बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. आरोपी शेषराव गौतम विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असून आरोपी फरार झाला आहे. याबाबतचा अधिक तपास टिटवाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्राची पांगे करत आहे .
No comments:
Post a Comment