Monday, 2 August 2021

पंचक्रोशी भूमिपुत्र गोरेगांव विभाग संघटनेच्या माध्यमातून महाड पोलादपूर येथील पूरग्रस्तांना मदत !

पंचक्रोशी भूमिपुत्र गोरेगांव विभाग संघटनेच्या माध्यमातून महाड पोलादपूर येथील पूरग्रस्तांना मदत !


     बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : रायगड जिल्ह्याच्या माणगांव तालुक्यातील देवळी, मूर, भिंताड, नागाव आणि चिंचवली या गावांतील पंचक्रोशी भूमिपुत्र संघटना गोरेगाव विभाग यांच्या माध्यमातून महाड तालुक्यातील पूरग्रस्तांना आणि गरजवंतांना एक हात मदतीचा या उद्देशाने महाड आणि पोलादपूर तालुक्यातील पूरग्रस्तांचा सर्वे करून  प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन त्यांच्या गरजा समजून घेऊन त्यांना मदत करण्यात आली. 


     या करीता पंचक्रोशी भूमिपुत्र गोरेगांव विभाग संघटनेचे पदाधिकारी यांची टीम महाड आणि पोलादपूर तालुक्यातील पूरग्रस्त पिडीत कुटुंबांचा त्या त्या ठिकाणी घटनास्थळी जागेवर जाऊन आढावा घेऊन एक हात मदतीचा घेऊन एक विचाराने एक संघटित होऊन एकामेकांशी हाताला हात देऊन पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तू, धान्य, कपडे इत्यादी वस्तूंच्या स्वरूपात पंचक्रोशी भूमिपुत्र संघटनेचे सदस्य आणि भूमिपुत्र आणि सामाजिक कार्यकर्ते. अध्यक्ष संतोष भात्रे अजय रेणुसे राजेंद्र बिरवाडकर अक्षय साळुंके, अनिकेत महाडिक विनेशजी डवले, योगेश भोसले, मंगेशजी गायकवाड प्रभाकर साळवी रोहन जाधव राजेश जाधव बाबुराव जाधव समीर जाधव हिरामण जाधव गौतम जाधव तेजस हाटे भूषण जाधव सुमित जाधव बबल हाटे भागवत शिर्के उमेश मोरे, आदित्य मोरे सूर्यकांतजी मोरे वरिष्ठ आणि ज्येष्ठ मार्गदर्शक रामचंद्रजी भोस्तेकर सितारामजी भोस्तेकर लक्ष्मण जाधव सुधाकर जाधव वसंतजी जाधव सुभाषजी जाधव धर्माजी जाधव आपले विश्वासू गाव चालक शंकरजी दांडेकर गंगाराम शिंदे माजी सरपंच शंकरजी शिर्के सुधाकरजी कासरेकर या संघटनेचे आधारस्तंभ वामन बापू बैकर रामदास वारीक महिला कार्यकर्ते, वनिता जाधव, विद्या जाधव, रेश्मा जाधव, सुप्रिया साळवी, सुषमा जाधव, लतिका जाधव, मनीषा जाधव, शकुंतला जाधव, अनिता जाधव, शेवंता जाधव, नंदा जाधव, रवीना जाधव, नंदा जाधव इत्यादींनी मदत केली. या सर्वांचे तसेच पत्रकार संघटनेचे उपरोक्त संघटनेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.

No comments:

Post a Comment

शाहीर जयंत चव्हाण (बापू) कलगी तुरा शाहिरी पुरस्कार २०२५ ने सन्मानित !!

शाहीर जयंत चव्हाण (बापू)  कलगी तुरा शाहिरी पुरस्कार २०२५ ने सन्मानित !! मुंबई (शांताराम गुडेकर)               बालपणापासून गायन व...