तृतीय पंथीयांसह समलैंगिक समुदयातील नागरिकांसाठी प्रस्तावित विशेष कोव्हिड-१९ लसीकरण केंद्राचा लोकार्पण सोहळा संपन्न !!
मुंबई, (केतन भोज) ; बृहन्मुंबई महानगरपालिका "एन" प्रभाग यांच्या सहकार्याने सेंट जोसेफ शाळा विक्रोळी, (पश्चिम) येथे तृतीय पंथीयांसह समलैंगिक समुदयातील नागरिकांसाठी विशेष कोव्हिड-१९ प्रतिबंधक मोफत लसीकरण केंद्राचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री सन्मा. श्री.राजेशजी टोपे यांच्या हस्ते करण्यात आला.
सदर लसीकरण केंद्र हे तृतीयपंथी व समलैंगिक समुदायाला समर्पित केलेले भारतातील पहिले मोफत लसीकरण केंद्र आहे.लसीकरण करण्यासाठी आलेल्या नागरिकांची विचारपूस करुन त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी मार्गदर्शन यावेळी करण्यात आले.
सदर प्रसंगी " एन " विभाग प्रभाग समिती अध्यक्षा व नगरसेविका सौ.स्नेहल सुनिल मोरे यांच्यासह स्थानिक नगरसेविका सौ.ज्योती हारुन खान,नगरसेविका सौ.राखी जाधव, उपायुक्त श्री.देवीदास क्षीरसागर (परिमंडळ ६), कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ.मंगला गोमारे, 'एन' विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री.संजय सोनावणे,सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. शीला जगताप, एन विभाग वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.महेंद्र खांदाडे, एलजीबीटी बिगर शासकीय संस्थेच्या प्रिया पाटील, सलमा खान यांच्यासह इतर मान्यवर व शिवसेना पक्षाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment