Wednesday, 25 August 2021

मार्चमध्ये निवडणुकांची रणधुमाळी ! राज्यातील रखडलेल्या नगरपालिका, महानगरपालिका निवडणुका होण्याची शक्यता !!

मार्चमध्ये निवडणुकांची रणधुमाळी ! राज्यातील रखडलेल्या नगरपालिका, महानगरपालिका निवडणुका होण्याची शक्यता !!


कल्याण : कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यामुळे आता स्थानिक निवडणुका घेण्याबाबत अखेर तयारी सुरू झाली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील महापालिका, नगरपरिषदेच्या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. या निवडणुका आता मार्च महिन्यात घेण्याची तयारी निवडणूक आयोगाने केल्याची माहिती समोर आली आहे. 

तब्बल अंदाजे ७ कोटी मतदार या निवडणुकीत आपले स्थानिक प्रतिनिधी निवडणार आहे. 
मुदत संपलेल्या महापालिकांमध्ये नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, वसई विरार, कोल्हापूर आणि औरंगाबाद महापालिकांचा समावेश आहे. फेब्रुवारीमध्ये मुदत संपणाऱ्या महापालिका १० बृहन्मुंबई, ठाणे, उल्हासनगर, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, अमरावती अकोला आणि नागपूर महापालिका आहे. तसेच, ३१० नगरपालिका आणि नगर पंचायत यात १ कोटी २६ लाख मतदार असतील. यात १०० नगरपालिकांची मुदत संपली आहे, तर फेब्रुवारीमध्ये २१० नगरपालिकांची मुदत संपणार आहे. सुमारे ३ कोटी ५० लाख मतदार असलेल्या २७ जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका होणार आहे. २७ जिल्हा परिषद आणि ५ जिल्हा परिषदांच्या पोटनिवडणूक त्याच बरोबर २९९ पंचायत समितीच्या निवडणूक होतील. 

ठाणे, पालघर वगळून सर्व जिल्हा परिषद निवडणूक होणार आहे. राज्यातील २०० ग्रामपंचायतच्या निवडणूक याच कालावधीत होतील. त्यामुळे निवडणुकीच्या प्रतिक्षेत असलेल्या इच्छुक उमेदवारांनी आता कामाला लागण्यास हरकत नाही.

No comments:

Post a Comment

१७ जानेवारी रोजी आपलं प्रतिष्ठानचा *हळदी कुंकू समारंभ* आणि *भोंदू बाबा , साधू- महाराज यांच्याकडून होणारे महिलांचे शोषण* ह्या विषयावर मार्गदर्शन !

१७ जानेवारी रोजी आपलं प्रतिष्ठानचा *हळदी कुंकू समारंभ* आणि *भोंदू बाबा , साधू- महाराज यांच्याकडून होणारे महिलांचे शोषण* ह्या विषयावर मार्गदर...