Wednesday, 25 August 2021

महापालिका परिसरातील रस्त्यांचा आता होणार कायापालट !!

महापालिका परिसरातील रस्त्यांचा आता होणार कायापालट !!


कल्याण : महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून महापालिका परिसरातील रस्त्यांचा आता कायापालट होणार असून महापालिका क्षेत्रातील 22 रस्त्यांमधील रस्ता दुभाजक व 7 वाहतुक बेटे यांचे सुशोभिकरण आणि निगा, देखभाल-दुरुस्तीसाठी महापालिकेने CREDAI-MCHI, कल्याण यांच्या बरोबर नुकताच एक सामंजस्य करार केला आहे. महापालिकेच्या विकास आराखडयातील  वाहतूक बेटे, रस्ता दुभाजक इ. चे सुशोभिकरण, निगा, देखभाल करण्यासाठी 5 वर्षाच्या कालावधीसाठी महापालिकेने हा करार केला आहे. यानुसार रस्ता दुभाजक, चौक यामध्ये हिरवळ, झाडे लावणे व त्यांची दैनंदिन निगा, देखभाल करणे त्याचप्रमाणे प्रत्येक रस्ता दुभाजकाला व गार्ड स्टोनला वर्षातून एकदा रंगरंगोटी करणे व वर्षातून दोन वेळा पाण्याने धुणे व किरकोळ दुरुस्ती सुद्धा करण्याची जबाबदारी संबंधित विकासकाची राहणार आहे. त्याबदल्यात वाहतूक बेटे व रस्ता दुभाजकाच्या विदयुत खांबावर जाहिराती चे हक्क विकासकांना विना शुल्क स्वरुपात देण्यात आले आहे. व तसेच सामाजिक संदेश व महापालिकेने दिलेले संदेश लावणे संबंधित विकासकास बंधनकारक राहील.

महापालिका क्षेत्रातील पुना लिंक रोड (सुचक नाका) ते विठ्ठलवाडी, चक्की नाका ते मलंग रोड, चेतना नाका ते साकेत कॉलेज, नेतीवली नाका ते चक्की नाका, मूरबाड डायव्हर्शन रोड (दुर्गाडी ते प्रेम ऑटो), गांधारी रोड (लाल चौकी ते गांधारी पुल), संतोषी माता रोड (सहजानंद चौक ते इंदिरा नगर), बेतुरकरपाडा ते खडकपाडा, बारावे रोड (खडकपाडा ते गोदरेज हिल), बिर्ला कॉलेज ते चिकणघर, निक्की नगर ते माधव संकल्प, निक्की नगर मधील भोईर चौक, विशाल भोईर चौक ते उंबर्डे रोड, एमएसआरडीए 45 मिटर ते साई सत्यम होम्स, कोलीवली रोड, विश्वनाथ भोईर बंगलो- 18 मिटर ते कडोमपा पाण्याची टाकी, काली मश्जिद ते चिकणघर, प्रेम ऑटो ते शहाड पूल, शहाड – मोहने रोड, वैष्णवी देवी मंदिर ते टिटवाळा स्टेशन, टिटवाळा स्टेशन ते गणेश मंदिर,रेल्वे समांतर (90 फुट रोड), ठाकुर्ली, सावित्रीबाई फुले नाटयगृह रोड, घारडा चौक ते मंजूनाथ शाळा या 22 रस्त्यांमधील रस्ता दुभाजक त्याचप्रमाणे चक्की नाका सर्कल कल्याण (पूर्व), म्हात्रे नाका सर्कल साकेत कॉलेज रोड कल्याण (पूर्व),  कोळीवली रोड 18 मी. व 15 मी. जंक्शन रस्ता येथील सर्कल, सेंट लॉरेन्स शाळेजवळ आधारवाडी कल्याण (प) येथील सर्कल, कोलीवली सर्कल, प्रांत ऑफिस वायले नगर चौक, टिटवाळा मंदिर सर्कल अशी 7 वाहतूक बेटे/सर्कल यांचे सुशोभीकरण करणेबाबत महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी मान्यता दिल्यानंतर करारनामा नुकताच महापालिकेच्या वतीने शहर अभियंता सपना कोळी-देवनपल्ली आणि CREDAI-MCHI चे अध्यक्ष श्रीकांत शितोळे यांनी केला असून सदर समयी महापालिकेचे कार्यकारी अभियंता सुभाष पाटील, मुख्य उदयान अधिक्षक संजय जाधव, CREDAI-MCHI चे सेक्रेटरी विकास जैन, खजिनदार साकेत तिवारी हे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

राज्यात १ एप्रिल पासून फास्ट टॅग अनिवार्य !

राज्यात १ एप्रिल पासून फास्ट टॅग अनिवार्य ! मुंबई, प्रतिनिधी : राज्यात १ एप्रिलपासून सर्व वाहनांना टोलसाठी फास्ट-टॅग बंधनकारक कर...