नाकाबंदी दरम्यान बाइक थांबवली म्हणून कल्याण येथे वहातूक पोलिसावर हल्ला !!
कल्याण, प्रतिनिधी : पोलिसांवर हल्ला झाल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. अशीच पोलिसांवरील हल्ल्याची एक घटना कल्याण येथे घडली आहे. नाकाबंदीदरम्यान भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीस्वाराला पोलिसांनी अडवले म्हणून दुचाकीस्वराने पोलिसावर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. राहुल रोकडे असे दुचाकी स्वराचे नाव आहेत. तर, प्रकाश पटाईत असे जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे. दरम्यान, कल्याण पश्चिमेकडील शहाड पुलाजवळ शुक्रवारी पोलिसांची नाकाबंदी सुरु होती. या ठिकाणी प्रकाश पटाईत आपले कर्तव्य बजावत होते. तिथे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई सुरु होती. त्यावेळी राहुल रोकडे भरधाव वेगाने दुचाकी घेऊन जात होता. त्यावेळी पटाईत यांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, राहुलने कट मारून तिथून निघून गेला आहे.
त्यानंतर काही अंतरावर गेल्यानंतर राहुल पुन्हा पटाईत यांच्याकडे आला आणि हुज्जत घालू लागला. दरम्यान, रस्त्यावरील दगड उचलून तो पोलिसांवर धावून गेला. मात्र, इतर पोलिसांनी त्याला समजावले. त्यानंतर या तरुणाने स्वत:ला जखम करुन घेतल्याने पोलिसांनी त्याला पाणी पाजण्याचा प्रयत्न केला. मात्र संतापलेल्या अवस्थेत रोकडेने पटाईत यांच्या डोक्याला दगडाने जखम केली. यामुळे पटाईत यांना त्यांच्या सहकाऱ्यांनी ताबडतोब रुक्णिणीबाई रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपाचार सुरु आहे. याप्रकरणी आरोपीलाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे.
No comments:
Post a Comment