समाजसेवक महेश देशमुख यांच्या मागणी ला अखेरीस यश, वरप ते पाचवामैल सिमेंट काँक्रीटीकरण होणार !!
कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण नगर महामार्गावरील म्हारळ ते पाचवामैल दरम्यान दरवर्षी पावसाळ्यात नागरिकांना खड्ड्याचा त्रास होत होता. अर्ज विनंती करून ही या खड्ड्याकडे शासन दुर्लक्ष करत होते. या विरोधात अखेरीस म्हारळ येथील समाजसेवक महेश देशमुख यांनी उपोषणाचे हत्यार उपसताच राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिका-यांनी त्यांची भेट घेऊन उपोषण न करण्याची विंनती करून हा रस्ता येत्या दोन महिन्यात सिंमेट काँक्रीटीकरण करण्याचे लेखी अश्वासन दिले. त्यामुळे आता नागरिकांची खड्ड्याच्या त्रासातून मुक्तता होईल.
कल्याण नगर महामार्गावर म्हारळ ते पाचवामैल या दरम्यान दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात खड्डे पडतात. दरवर्षी ते नेहमीप्रमाणे बुजवले जातात. पण पुन्हा जै थे २००५, २०१९ आणि आता२०२१ मध्ये आलेल्या पुरामुळे तर हा रस्ताच वाहून गेला. येथे एक ते दिडफुट इतके मोठे खड्डे पडलेले होते, या खड्ड्यात पडुन अनेकवेळा अपघातही झाले होते. येथे कोणी जागृत लोक राहतात की नाही असे प्रश्न नागरिक विचारत होते. त्यामुळे म्हारळ गावातील समाजसेवक महेश देशमुख यांनी या विरोधात सहका-यांना घेऊन वेळोवेळी उपोषण केले.
सार्वजनिक बांधकाम विभागाने, तसेच राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळाने वेळ मारून नेण्यासाठी तात्पुरते खड्डे बुजवून समाधान केले, पण परत परिस्थिती जैथे होत असल्याने यावेळी मात्र देशमुख यांनी आरपार ची लढाई सुरू केली. ज्या कारणांमुळे हा राष्ट्रीय महामार्ग म्हारळ येथे पाण्याखाली जातो, येथे पाच मो-या आणि म्हारपाडा ते पाचवामैल या दरम्यानचा रस्ता संपूर्ण सिंमेट काँक्रीटीकरण करण्यासाठी १७ आँगस्ट ला पुन्हा उपोषणाला बसण्याचा इशारा दिला. याची दखल राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळाच्या अधिका-यानी घेऊन महेश देशमुख यांना उपोषण न करण्याची विंनती केली.
राष्ट्रीय महामार्ग जुना क्रमांक २२२नवीन क्रमांक ६१ कल्याण मुरबाड रोड ला जे खड्डे पडले आहेत त्या संदर्भात राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे रस्त्याची झालेली दुरवस्था या संदर्भात तक्रार केली होती व तसेच सदर रस्त्याचे खड्डे दुरुस्ती चे काम ताबडतोब सुरू न केल्यास उपोषणाला बसण्याच कळवले होते. या संदर्भात समाजसेवक महेश देशमुख यांना विचारले असता ते म्हणाले :-
त्या संदर्भात माझा तक्रारी अर्जाची तातडीने दखल घेऊन संबंधीत विभागाचे अधिकारी यांनी खड्डे दुरुस्तीचे काम १७ तारखे पासून सुरू करण्याचे लेखी आश्वासन मला प्रत्यक्ष भेटून दिले व माझे उपोषण स्तागित करण्यासाठी विनंती केली. सदर लेखी आश्वासनच विचार करता मी माझे उपोषण मागे घेत आहे व तसेच वरप ते पाचवा मैल दरम्यान रस्ता २ महिन्यात सिमेंट काँक्रिट सुरू करू असे ही त्यांनी सांगितले आहे. या संदर्भात आमदार श्री. कुमार आयलानी साहेब यांनी सुध्दा पत्र देवून उचित कार्यवाही ची मागणी केली होती तसेच आज केंद्रीय पंचायत राज्य मंत्री कपिल पाटील हे देखील या भागाची भेट घेऊन पाहणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यामुळे म्हारळ, वरप, कांबा या भागासह कल्याण नगर या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या सर्व वाहनचालक व नागरीकांची जिवघेण्या खड्ड्यातून मुक्तता होणार आहे.
No comments:
Post a Comment