Tuesday, 17 August 2021

डीजिटल माध्यमाच्या पत्रकारांना तात्काळ माहिती पुरवावी – (MDMA) जळगाव जिल्हाध्यक्षांचे माहिती जिल्हा अधिकारींना निवेदन !

डीजिटल माध्यमाच्या पत्रकारांना तात्काळ माहिती पुरवावी – (MDMA) जळगाव जिल्हाध्यक्षांचे माहिती जिल्हा अधिकारींना निवेदन !


जळगाव :
राज्य शासनाच्या वतीने डिजिटल मीडिया पत्रकारांसाठी राज्यस्तरीय पुरस्कार दरवर्षी जाहीर केला जातो.                   

मात्र या पुरस्काराच्या अटी मध्ये शासकीय बातम्या असाव्या असे स्पष्टपणे सांगितले महाराष्ट्रातील अनेक डिजिटल माध्यमातील समाज माध्यमातील पत्रकार दर्जेदार लिखाणाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचे काम करतात.

हे काम करत असताना कोणत्याही बाबतीत शासन आर्थिक दृष्ट्या मदत करीत नाही अथवा जाहिराती सुद्धा देत नाही.

डिजिटल माध्यमांच्या पत्रकारांना इतर माध्यमांच्या पत्रकार या प्रमाणे कोणत्याही सुविधा मिळत नाहीत. 

जळगाव जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाकडून शासकीय बातम्या योजनांची माहिती आणि दौरे व पत्रकार परिषदा याबाबत काहीही अधिकृत माहिती मिळत नाही.

त्यामुळे डिजिटल माध्यम समाज माध्यमांचे पत्रकार राज्य शासनाच्या पुरस्काराला प्रवेशिका पाठवण्यास पात्र ठरत नाहीत. त्यामुळे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे याबाबत तातडीने आदेश काढून राज्यातील सर्व जिल्हा माहिती अधिकाऱ्यांना डिजिटल माध्यमाच्या पत्रकारांना सर्व शासकीय बातम्या योजनांची माहिती पत्रकार परिषदा व दौरे याबाबत माहिती पुरवण्याचे निर्देश द्यावे. 

अशी मागणी महा डिजिटल मीडिया असोसिएशनच्यावतीने एका पत्रातून केलेली आहे.

महा डिजिटल मिडिया असोसिएशन ही राज्यातील एकमेव स्व नियामक संस्था म्हणून कार्यरत असून डिजिटल माध्यमांच्या पत्रकारांच्या हितासाठी काम करते. 

संबंधित पत्रासोबत महा डिजिटल मीडिया असोसिएशनच्या सर्व सन्माननीय सभासदांची यादी सुद्धा माहिती व जनसंपर्क महासंचालनालय कडे पाठवलेली आहे.
 
डीजिटल माध्यमाच्या पत्रकारांना तात्काळ माहिती पुरवावी – एम डी एम ए(MDMA) जळगाव जिल्हाध्यक्ष तथा सूक्ष्मलोक न्यूज संपादक् विठ्ठल कौतिक पाटील यांचे जळगाव जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांना निवेदन देण्यात आले आहे.

मो. +91 94231 59516

No comments:

Post a Comment

दैनिक युवक आधारच्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न !

दैनिक युवक आधारच्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न ! पनवेल, (केतन भोज) : दैनिक युवक आधारच्या पहिल्या वर्षाच्य...