Tuesday, 17 August 2021

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत न्यू इंग्लिश स्कुल खांडोत्री येथे वृक्षारोपण !!

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत न्यू इंग्लिश स्कुल खांडोत्री येथे वृक्षारोपण !!


कोकण - (दिपक कारकर)

१५ ऑगस्ट २०२१ रोजी भारताचा ७५ वा स्वातंत्र्यदिन देशभर मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. या सणाचे औचित्य साधून सह्याद्री शिक्षण संस्था, सावर्डे संचलित न्यू इंग्लिश स्कुल खांडोत्री-आबिटगाव या विद्यालयात सकाळी ०८ वाजता स्कुल कमिटीचे चेअरमन भालचंद्र गांगण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तद्नंतर वृक्षारोपण काळाची गरज आहे या भावनेतून वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला. 


दरम्यान स्कुल कमिटी सदस्य भागुराम पवार, बाळाराम भागडे, रश्मीताई सकपाळ तसेच खांडोत्री गावचे सरपंच सखाराम सुवरे, पोलीस पाटील सुरेश पवार व प्रतिष्ठित नागरिक बुद्धदास पवार, महादेव पवार, अशोक कोदारे, गणेश गांगण, संतोष पवार, प्रदीप पवार तसेच विद्यालयाचे माजी विद्यार्थी सुरज कातकर, साहिल सुवरे, रोशन खेराडे, किशोर खराडे, प्रथमेश भागडे उपस्थित होते.

विद्यालयातील सर्व शिक्षक वृंद व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत हा सोहळा यशस्वी झाला. विद्यालयाचे मुख्याध्यापक मोरे सर यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सावंत सर यांनी केले.

No comments:

Post a Comment

193 देशांच्या ग्लोबल करन्सी नोट व पोस्टल स्टॅम्प प्रदर्शन तसेच आंतर शालेय विज्ञान प्रदर्शन व पोस्टर् स्पर्धा 2025 !

193 देशांच्या ग्लोबल करन्सी नोट व पोस्टल स्टॅम्प प्रदर्शन तसेच आंतर शालेय विज्ञान प्रदर्शन व पोस्टर् स्पर्धा 2025 ! डोंबिवली, प्...