नवोदित कवी पांडुरंग आलीम यांच्या लिखाणाला "उत्कृष्ट काव्य" सन्मान !!
कोकण - (दिपक कारकर) :
चिपळूण तालुक्यातील मुर्तवडे कातळवाडी गावचे भूमिपुत्र नवोदित कवी म्हणून नावारूपास येणारे पांडुरंग आलीम यांनी आजवर अनेक काव्यलेखन स्पर्धेत सहभाग नोंदवत यश प्राप्त केले आहे. मात्र नुकत्याच पार पडलेल्या मोंढयाचा राजा समूह आणि सूर संगीत समूह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय काव्य लेखन स्पर्धेत बक्षिस मिळताना उत्कृष्ट काव्य म्हणून त्यांच्या काव्याला गौरविण्यात आले.
स्व.भाऊसाहेब जामगे यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत अनेक कवी/कवयित्री यांनी सहभाग घेतला होता.या स्पर्धेच्या "श्री गणेशा आगमन" या दिलेल्या विषयावर काव्य करत नवोदित कवी पांडुरंग आलीम छान लिखाण करत हे उत्तुंग यश संपादन केले आहे. आयोजकांतर्फे त्यांना रोख रक्कम आणि सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. नवोदित कवी पांडुरंग आलीम यांचे अनेकांकडून अभिनंदनासह कौतुक होत आहे.
No comments:
Post a Comment