Wednesday, 18 August 2021

भिवंडीतील टोल अंतर्गत खड्ड्यान विरोधात मनसे आक्रमक, टोल वसुली कायमस्वरूपी बंद पाडणार --डी. के. म्हात्रे.!

भिवंडीतील टोल अंतर्गत खड्ड्यान विरोधात मनसे आक्रमक, टोल वसुली कायमस्वरूपी बंद पाडणार --डी. के. म्हात्रे.!


भिवंडी, दिं.18, अरुण पाटील (कोपर) :
                  भिवंडी तालुक्यातील ग्रामीण पट्टयातील कशेळी - अंजूर फाटा, मानकोली ते वसई- कामण- चिंचोटी फाटा राज्य मार्गावरील अंजुरफाटा ते खारबाव रस्ता खाजगिकरणातून बनवण्यात आला आहे. मात्र, या महामार्गाच्या खड्यांमुळे अत्यंत दुरावस्था झाली. आता या टोल नाका अंतर्गत येणाऱ्या खड्यांच्या विरोधात भिवंडी तालुक्यातील मनसे रस्त्यावर उतरली असून मंगळवार (दिं,17) रोजी मनसे प्रदेश उपाध्यक्ष डी. के. म्हात्रे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह अंजूर फाटा -चंचोटी मार्गावरील मालोडी टोलनाका येथे आंदोलन करून येत्या चार दिवसांत या रस्त्याची दुरुस्ती न केल्यास या रस्त्यावरील टोल वसुली कायमस्वरूपी बंद पडण्याचा इशारा म्हात्रे यांनी यावेळी दिला आहे.       
        कशेळी टोल नका व मालोडी टोल नका येथून मोठ्या प्रमाणावर टोल वसुली केली जात आहे, मात्र रस्त्याच्या डाग डुगी कडे जैविक पूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप स्थानिकांकडून होत असून या खड्ड्यांमुळे प्रवाशांना कंबरेचे, मणक्यांचे व पाठीचे आजार जडले आहेत. त्यामुळे येथील  खड्यावरील रस्त्याच्या विरोधात स्थानिक ग्रामस्थांच्या गाव विकास समितीच्या नेतृत्वाखाली या रस्त्यावर चार ठिकाणी रास्तारोको आंदोलन केले जाणार आहे. या खंड्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. दरम्यान, या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अनेक बळी गेलेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर निष्पापांची राज्यशासन जबाबदारी घेणार का? असा सवाल उपस्थित करीत चांगले रस्ते बनवा अन्यथा टोल वसुली बंद करा असा इशारा यावेळी मनसे तर्फे दिला.

No comments:

Post a Comment

वी नीड यू सोसायटीचे २०२४चे शिक्षण, समाज व कार्यव्रती पुरस्कार जाहीर !!

वी नीड यू सोसायटीचे २०२४चे शिक्षण, समाज व कार्यव्रती पुरस्कार जाहीर !! ठाणे, प्रतिनिधी : वी नीड यू सोसायटी संस्थेतर्फे समाजात ‘व...