Wednesday, 18 August 2021

मायेची सावली ग्रुपच्यावतीने एक हात कर्तव्याचा !

मायेची सावली ग्रुपच्यावतीने एक हात कर्तव्याचा !


मुंबई, (शांत्ताराम गुडेकर) :
   
      मायेची सावली ग्रुपच्यावतीने एक हात कर्तव्याचा म्हणून सिंधुदुर्ग जिल्हाचे खासदार श्री. विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली २२ जुलै २०२१ रोजी ढग फुटी होऊन महाड, खेड, चिपळुन, येथे पुराच्या पाण्याने काही लोकांचे संसार उध्वस्त झाले. ते संसार उभे करण्यासाठी एक हात कर्तव्याचा हा उपक्रम म्हणून स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून मायेची सावली या ग्रुपच्या वतीने चिपळुन येथील दळवटणे गावातील नलावडे वाडी, इंगवले (बागवाडी) व कळंबस्ते येथील पुरग्रस्तांन साठी गॕस शेगडी, अन्नधान्य व गृहपयोगी वस्तुचे वाटप करण्यात आले. या वेळी ग्रुपचे श्री.अवि राऊत, जगन्नाथ जाधव, यशवंत खोपकर, रविंद्र जाधव खजिनदा श्री.गणेश काळे, दिपक चौधरी, बंडू चौधरी, विनायक जाधव,संजय चव्हाण व प्रकाश कुष्टे हे सदस्य उपस्थित होते. दरम्यान सर्व देणगीदार, वर्गणीदार हितचिंतक व ग्रुप पदाधिकारी, सदस्य आणि सभासद यांचे मनःपूर्वक आभारही व्यक्त करण्यात आले. समाजाचे आपण काही तरी देणे लागतो ही भावना मनात ठेऊन राबवलेल्या या उपक्रमाचे अनेकांकडून कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment

वी नीड यू सोसायटीचे २०२४चे शिक्षण, समाज व कार्यव्रती पुरस्कार जाहीर !!

वी नीड यू सोसायटीचे २०२४चे शिक्षण, समाज व कार्यव्रती पुरस्कार जाहीर !! ठाणे, प्रतिनिधी : वी नीड यू सोसायटी संस्थेतर्फे समाजात ‘व...