Wednesday, 18 August 2021

पुरग्रस्त पत्रकारांना कल्याण पंचायत समितीच्या उपसभापतींची मदत, पत्रकारांचा यथोचित सन्मान करणार !!

पुरग्रस्त पत्रकारांना कल्याण पंचायत समितीच्या उपसभापतींची मदत, पत्रकारांचा यथोचित सन्मान करणार !!


कल्याण, (प्रतिनिधी) : २२जुलैमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे व नद्यांना आलेल्या पुरामुळे कल्याण तालुक्यातील काही पत्रकांराच्या घरात पाणी शिरल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे याची दखल कल्याण पंचायत समितीचे कर्तव्य दक्ष उपसभापती किरन चंदूशेठ ठोंबरे यांनी घेऊन त्यांना जिवनावश्यक वस्तू मदत स्वरूपात देण्यात आली. त्यामुळे पत्रकारांनी त्यांचे आभार मानले.


२२ जुलै रोजी कल्याण परिसरात मुसळधार पाऊस पडला. यामुळे तालुक्यातील चारही नद्याना पुर आला होता. पुराचे पाणी इतके झपाट्याने वाढले की काही कळायच्या आत सर्वत्र पाणीच पाणी भरले, विशेष म्हणजे सर्व मुख्य रस्ते पाण्याखाली गेल्याने अडचणीत भरच पडली. यामध्ये इतरांच्या प्रमाणे पत्रकारांच्या घरात देखील पाणी भरले. 


भातसा नदीला आलेल्या पुरामुळे खडवली येथील पत्रकार विलास भोईर यांचे तर उल्हास नदीस आलेल्या पुरामुळे वरपगावात राहणारे पत्रकार संजय कांबळे यांचे मोठे नुकसान झाले. काही दिवसांपूर्वी महसूल विभागाच्या तलाठी यांनी पंचनामे केले परंतु अद्यापही काही नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यामुळे ही बाब कल्याण पंचायत समितीचे कर्तव्य दक्ष उपसभापती किरन चंदूशेठ ठोंबरे यांच्या लक्षात आली. त्यांनी पत्रकार संजय कांबळे यांच्या जवळ  आपण पत्रकारांना मदत करण्याची इच्छा व्यक्त केली. 


त्यानुसार आज कल्याण पंचायत समितीच्या त्यांच्या कार्यालयात पत्रकार संजय कांबळे, विलास भोईर, राजू टपाल, सिध्दार्थ गायकवाड, आणि प्रविण आंब्रे आदींना जीवनावश्यक वस्तूचे किट वाटप करण्यात आले. यावेळी भविष्यात कोरोनाकाळात तसेच पुरपरिस्थिती आपला जीव धोक्यात घालून पत्रकारिता करणाऱ्या कल्याण तालुक्यातील पत्रकारांचा यथोचित सन्मान सोहळ्याचे आयोजन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 


या प्रंसगी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे रमेश जाधव,विस्तार अधिकारी विक्रम चव्हाण, आहे मान्यवर उपस्थित होते. तर अशा अडचणीत आमची दखल घेऊन आम्हाला मदत केल्याबद्दल उपस्थित पत्रकारांनी उपसभापती किरन ठोंबरे यांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment

वी नीड यू सोसायटीचे २०२४चे शिक्षण, समाज व कार्यव्रती पुरस्कार जाहीर !!

वी नीड यू सोसायटीचे २०२४चे शिक्षण, समाज व कार्यव्रती पुरस्कार जाहीर !! ठाणे, प्रतिनिधी : वी नीड यू सोसायटी संस्थेतर्फे समाजात ‘व...