गुहागरचे शाहिर विनोद फटकरे यांना पितृशोक !
कोकण - (दिपक कारकर) :
गुहागर तालुक्यातील सुप्रसिद्ध शाहिर/गुहागर तालुका नमन संघटना - उपाध्यक्ष व श्री काळेश्वरी नाट्य नमन मंडळ, (मढाळ - गुहागर) या नमन मंडळाचे निर्माते शाहिर विनोद फटकरे यांचे वडिल बाबू रामचंद्र फटकरे यांचे बुधवार दि.१८ ऑगस्ट २०२१ रोजी राहत्या घरी दुपारी ०१ : ०० वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. मढाळ गावचे हे एक कलाप्रेमी व्यक्तिमत्त्व होते. शाहिर विनोद फटकरेंच्या वडिलांनी गावच्या नमन कलेतून अनेक वर्षे कला जोपासली. त्यांचं साधं-सरळ वागणं आणि प्रेमळ स्वभातून ते अनेकांना प्रिय होते. त्यांच्या पश्चात मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांना श्री काळेश्वरी नाट्य नमन मंडळ, श्री पाणबुडी देवी कलामंच/मढाळ ग्रामीण- मुंबई मंडळ व कोकणच्या नमन/जाखडी-नृत्य कलेतील कलाकारांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
No comments:
Post a Comment