शासनाने पूरग्रस्त व्यापारीवर्गाला जाहीर केलेली मदत त्वरित द्यावी व्यापारी व सामाजिक कार्यकर्ते सचिन नाटेकर यांची मागणी !
मुंबई, (समीर खाडिलकर / शांत्ताराम गुडेकर) :
व्यापारी वर्ग गेली दोन तीन वर्षे महापुर, करोना महामारी, मंदी यातून भरडला जात आहे. व्यापारीवर्गाच्या खालील मुद्दे शासन दरबारी व प्रसार माध्यमे यामधून लावून धरावे जणेकरुन व्यापारीवर्गाला न्याय मिळेल. यामध्ये शासनाने जाहीर केलेली तातडीची मदत पूरग्रस्त व्यापारीवर्गाला ३० आँगस्ट पुर्वी अदा करावी. विमा कंपनीनी नियमांचा बागुलबुवा न करता व्यापारी चे विमा क्लेम त्वरित मंजूर करावेत. बँका व फायनान्स कंपनीनी कर्ज वसुली करीता तगादा लावु नये. कर्ज भरण्यास मुदतवाढ द्यावी. शासनाने व्यावसायिक ना कर्जावरील व्याज माफ करावे. तसेच किमान तीन महिन्यांचे विज बिलही माफ करावे. कोणत्याही व्यावसायिकचे विज कनेक्शन तोडु नये. विज बिल हप्ते नी भरण्यासाठी सवलत द्यावी. व्यापारींना शुन्य टक्का व्याज दराने कर्ज पुरवठा करावा. सतत दोन वेळा आलेला महापुर, करोना महामारी, लाँकडाउन यामध्ये व्यापारी वर्ग उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. बँक कर्जे, दुकान भाडे, नोकर पगार, लाईट बिल, मुलांच्या शाळांची फि, इतर दैनंदिन खर्च हे प्रश्न व्यापारी बांधवासमोर आहेत.
व्यापारी आत्मनिर्भरच आहे. पण आज त्याला ख-या अर्थाने शासकीय मदतीची गरज आहे. दुकाने बंद असल्याने पाडवा, लग्न सराई सिझन, तसेच पावसाळी सिझनही वाया गेला. महापुरात व्यापारांच्या होत्याचे नव्हते झाले. आता गणेश चतुर्थी सिझन जवळ आला आहे. दुकानात माल कसा भरावा या विवंचनेत व्यापारी आहेत. लाँकडाऊनची टांगती तलवार डोक्यावर आहेच. व्यापारी देणी व बँका,फायनान्स कंपन्या चा ससेमिरा आहेच. तरी सरकारने याची दखल घेवून व्यापारीवर्गाला जाहीर केलेली मदत त्वरित अदा करावी. जेणेकरून व्यापारी आपला व्यवसाय पुन्हा सुरू करु शकतील अशी मागणी सचिन नाटेकर (व्यापारी व सामाजिक कार्यकर्ते बांदा) यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment