मायेची सावली ग्रुपने केला वनिता चव्हाण या ८३ वर्षीय आजीचा सत्कार व कर्तव्य म्हणून गँस शेगडीसह दिले अन्नधान्य कीट !
मुंबई, (शांत्ताराम गुडेकर) :
मायेची सावली या ग्रुपतर्फे मु.पो.आसुर्डे येगाव वाणे वाडी ता.चिपळुन येथील वनिता मनोहर चव्हाण (वय वर्षे ८३) या आजी पुराच्या पाण्यात ४ तास अडकलेल्या होत्या. काही गावातील तरुणांनी त्यांना पाण्याच्या विळख्यातून बाहेर काढले व त्यांचे प्राण वाचविले. चिपळुण येथे त्यांची मुलगी श्रीमती. पालांडे ताई यांच्या घरी जाऊन मायेची सावली या ग्रुपच्या वतीने त्याचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. ग्रुपतर्फे गॕस शेगडी व अन्नधान्यही देण्यात आले. यावेळी ग्रुप सदस्य घाटकोपर विधानसभा संघटक श्री.अवि राऊत, श्री.जगन्नाथ जाधव, यशवंत खोपकर, गणेश काळे, रविंद्र जाधव, बंडु चौधरी, संजय चव्हाण, विनायक जाधव, प्रकाश कुष्टे, दिपक चौधरी, शिवाजी होडे आदी मान्यवर उपस्थित होते. ग्रुपचे आजी वनिता चव्हाण तसेच पालांडेताई व चिपळूण मधील कौतुक करत ग्रुपचे पदाधिकारी, सदस्य व सभासद आणि हितचिंतक यांचे आभार व्यक्त केले.
No comments:
Post a Comment