Thursday, 19 August 2021

माणसाप्रणाणेच केले मृत पावलेल्या बैलाचे सर्व विधी.. 'फळेगांवातील जाधव‌ कुटूंबाचे आपल्या बब्या बैला प्रतीच्या प्रेमाचे दर्शन'....

माणसाप्रणाणेच केले मृत पावलेल्या बैलाचे सर्व विधी..
'फळेगांवातील जाधव‌ कुटूंबाचे आपल्या बब्या बैला प्रतीच्या प्रेमाचे दर्शन'....


टिटवाळा, उमेश जाधव -: माणुसकीच्या नात्याने माणूस केवळ माणसाशीच नव्हे, तर प्राण्यांशी देखील नातेसंबंध जोडत असतो. ते संबंध जोडणे माणसाला आवडते. ज्यांच्या घरात पाळीव प्राणी असेल, तर तो त्या कुटुंबाचा एक सदस्यच होतो. 


घरातील एखाद्या लहान मुलाला ज्याप्रमाणे जिव्हाळा लावला जातो, प्रेम दिले जाते, त्याचप्रमाणे पाळीव प्राण्यावर प्रेम केले जाते. असे प्रेम व‌ जिव्हाळा फेळेगांव येथील जाधव कुटूंबाने आपल्या बब्या बैलाला लावला होता. आपल्या लाडक्या बब्याचा ६ ऑगस्ट रोजी अकस्मात निधन झाल्याने जाधव कुटूंबावर दुःखाचे सावट कोसळले. त्यांची माणसाप्रमाणे अंत्य यात्रा काढत अंत्यसंस्कार केले. तर बुधवारी बब्याला मृत्यू नंतर चांगली गती मिळावी म्हणून तेराव्याचा कार्यक्रम देखील केला. 


आपण समाजात वावरत असतांना घरोघरी पाळले जाणारे पाळीव प्राणी पहात असतो. हे  प्राणी जेव्हा आपल्या घरच्या सदस्यासारखे घरात वावरतात तेव्हा आपल्या जवळच्या माणसासारखीच त्यांची काळजी घेणे भाग पडते. आज मनुष्य कोणत्याही कारणाने प्राण्यांचे पालन करीत असला तरी पाळीव प्राणी आणि मनुष्य या परस्परांत जिव्हाळ्याचे, मैत्रीचे नाते निर्माण होते. अशाच प्रकारे कल्याण तालुक्यातील फळेगांव येथील रहिवासी पत्रकार उमेश जाधव यांचे‌ सख्खे चुलात भाऊ उद्योजक संजय जाधव, राजाराम जाधव, नितिन जाधव व प्रशांत जाधव यांच्या बैलाचा ६ ऑगस्ट रोजी अकस्मात मृत्यू झाला होता. त्याच्यावर मनुष्या प्रमाणे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांनतचे दशक्रिया व तेराव्याचा (उत्तरकार्य) कार्यक्रम बुधवारी पार पडला. यावेळी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रामायणाचार्य आनंद महाराज देसले यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम पार पडला. या तेराव्याच्या कार्यक्रमाला ठाणे व रायगड जिल्ह्यातील बब्यावर प्रेम करणाऱ्या शेकडो चाहत्यांनी हजेरी लावली होती. तर परीसरातील अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. उत्तर कार्याचा कार्यक्रम मनुष्याच्या कार्यासारखाच धार्मिक विधी नुसार करण्यात आला. 


बब्या हा आमचा बैलं नव्हता तर तो आपचा सदस्य, मुलगाच होता. लहानाचा मोठा होत तो आमच्या घरात वावरला. पोरांसोबत खेळला, शेण काढतांना महिलांशी कधी वाईट वागला नाही. तो जाण्याने सर्वांनाच खूप दुःख झाले आहे. 'संजय जाधव, बब्याचे मालक'

अशा प्रकारे प्राण्यांवर जिव लावणारे व त्यांचे कार्य करणारी लोकं समाजात मोजकीच असतात. जाधव कुटूंबाच्या मुक्या प्राण्यांवरील प्रेमाची व या केल्या कार्या बद्दल परमेश्वराकडून जाधव कुटूंबावर चांगलीच कृपा होईल.: "आनंद महाराज देसले, रामायणाचार्य"

No comments:

Post a Comment

निळजे गाव येथे आई एकवीरा देवी पदयात्रा पालखी सोहळा मोठया भक्तिमय वातावरणात संपन्न ! ** ह. भ. प. श्री जितेन्द्र महाराज पाटील यांच्या कीर्तनान...