कपिल पाटलांच्या जन आशीर्वाद यात्रेचा नागरिकांना वाहतूक कोंडीचा फटका..!
'जन आशीर्वाद यात्रेवर पावसाचे विरजण'...
टिटवाळा, उमेश जाधव -: केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर ज्या ज्या नेत्यांना मंत्रिपदं दिली आहेत, अशा सर्व मंत्र्यांची मोठा गाजावाजा करत जन आशीर्वाद यात्रा भाजपकडून काढण्यात येत आहे. याच धर्तीवर टिटवाळा शहरी भागास ग्रामीण भागातून बुधवारी केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांची जनआशीर्वाद यात्रा काढण्यात आली. या यात्रेमुळे टिटवाळा गणपती मंदिर चौक ते जगातनाका गोवेली रोडवर वाहतूक कोंडीचा नागरिकांना त्रास सहन करावा लागला. तसेच या यात्रेवर पावसाचे विरजण पडल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह मात्र मावळला.
देशाचा कारभार लोकाभिमुख व्हावा या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी, ठाणे जिल्ह्यातील पहिले केंद्रीय मंत्री व भिवंडी लोकसभेचे खासदार केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील यांची जन आशीर्वाद यात्रा अनेक जिल्ह्यातून संपन्न होणार आहे. या धर्तीवर बुधवारी टिटवाळा शहरी भागासह ग्रामीण भागातून या यात्रेचे आगमन झाले. जागोजागी पाटील यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. परंतु रात्री पासूनच पावसाची रिपरिप सुरू असल्याने यात्रेत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांचा उत्साह मात्र काही प्रमाणात मावळला. तसेच या जन आर्शिवाद यात्रेत मोठ्या प्रमाणात चारचाकी व दुचाकी वहाने सहभागी झाल्याने टिटवाळा गणपती मंदिर चौक ते जकात नाका गोवेली रोड पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. याचा फटका स्थानिक नागरिक व बाप्पाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना बसल्याने नाराजीचा सूर निघत होता.
No comments:
Post a Comment