Friday, 13 August 2021

मुद्रांक विक्रेत्यांकडून जनतेची लुट, चढ्या भावाने विक्री, कल्याणात आधळं दळतय कुत्र पिटं खातयं ?

मुद्रांक विक्रेत्यांकडून जनतेची लुट, चढ्या भावाने विक्री, कल्याणात आधळं दळतय कुत्र पिटं खातयं ?


कल्याण, (संजय कांबळे) : कोरोनाच्या कडक निर्बंधातून थोडीशी मोकळीक मिळाल्याने जनता आपल्या अनेक कामानिमित्ताने बाहेर पडू लागली आहे. त्यांच्या ज्युडिशल नाँन ज्युडिशल कामासाठी मुद्रांक अर्थात स्टँम पेपर खरेदी करु लागले आहेत, परंतु नेमक्या याच संधी चा फायदा काही संधीसादू मुद्रांक विक्रेते घेत असून शासनाने कमिशन निश्चित केले असताना चड्ड्या भावाने मुद्रांक शुल्क आकारले जात असून याची तक्रार मात्र आपल्या कडे करता येत नसून याचेवर कारवाई चे अधिकार हे सबरजिस्टर यांच्या कडे असल्याचे सांगून उपकोषागार कल्याण यांनी खांदे उडवले. तर कारवाई चे अधिकाराचे धनी असलेले सबरजिस्टर म्हणजे ,आधळं दळतय अन् कुत्र पिट खातय अशी अवस्था असल्याचे बोलले जाते.


अनेक ज्युडिशल व नाँन ज्युडिशल कामासाठी स्टँम पेपर वापरले जातात,प्राँप्रर्टिचे खरेदी विक्री व्यवहार, सत्यप्रतिज्ञालेख, करार, कोर्ट कामे, बँकांचे डिक्लेरेशन, आदी विविध प्रकारच्या कामासाठी ते वापरले जाते. याकरिता शासनाने परवाना धारक मुद्रांक विक्रेते ठेवलेले आहेत, यानुसार कल्याण तहसीलदार कार्यालय परिसरात मोजून ३ मुद्रांक विक्रेते आहेत. कल्याण हे जंक्शन तर आहेच, शिवाय येथे उपजिल्हा न्यायालय उपविभागीय अधिकारी कार्यालय, आणि तहसील कार्यालय असे मोठी कार्यालये आहेत, त्यामुळे अगदी ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातून नागरिक विविध प्रकारच्या कामासाठी कल्याण ला ये जा करतात, त्यांना लागणारे स्टँम पेपर येथूनच खरेदी करतात. येथे मुद्रांक शुल्क चे उप कोषागार यांचे कार्यालय ही आहे, पण ते फक्त सप्लायर्स चे काम करतात असे त्यांचे म्हणणे आहे. यावर नियंत्रण हे सह दुय्यम निबंधक यांचे असल्याचे ते अगदी ठासून सांगतात आणि यांची कार्यालये चिकणघर कल्याण, होलीक्रास, हाँस्पिटल, डोंबिवली गांधीनगर व तँटे प्लाझा डोबिवली पुर्व येथे आहेत, तेथे जाऊनही तूम्ही तक्रार दाखल केली तरीही त्यांची किती दखल घेतली जाईल हा संशोधनाचा विषय ठरू शकतो.

नेमका याच संधीचा फायदा या मुद्रांक विक्रेत्यांनी घेतला आहे, आज कल्याण तहसील कार्यालय परिसरात जागा मिळेल तेथे हे बसले आहेत, अगदी शंभर रुपयाचा स्टँम पेपर चक्क १२० ते १५० रुपयांना विकला जातोय, तर ५ रुपयाचे कोर्ट फी ७ रुपयांना विकले जाते.

आणि ग्राहकाची सही मात्र त्यांच्या रजिस्टर ला बरोबर तेवढ्याच रक्कमेच्या पुढे घेतली जाते. हे विशेष, या विरोधात काही बोलण्याचा प्रयत्न केला तर सरळ स्टँम पेपर देण्यास नकार दिला जातो. अधिकृत मुद्रांक विक्रेत्यांना केवळ मुद्रांक विक्री परवाना दिला असताना, त्यांचे ते पँसिपिक काम असताना केवळ कमिशन परवडत नाही म्हणून या व्यतिरिक्त मे विक्रेते अफिडेव्हिड, आँनलाईन ई चलन भरुन देणे, डाँकिमेंन्ट रजिस्टर करुन देणे, ब्लॉक मध्ये मुद्रांक पेपर विकणे आदी कामे केली जातात. व याकरिता चढ्या भावाने पैसा वसूल केला जातो. अर्थात हे सगळं सह दुय्यम निबंधक महाशयांना माहीत नाही असे मुळीच नाही,फक्त तू कर मारल्या सारखे व मी करतो रडल्या सारखे अशी भूमिका आहे, एकुणच काय तर कल्याणात 'खाबुगिरी बोकाळली आहे, ऐवढे मात्र खरे,त्यामुळे आता जनता जनार्दनीं काय तो निर्णय घ्यायचा आहे,

*प्रतिक्रिया'-मुद्रांक विक्रेत्यावर नियंत्रण हे सह दुय्यम निबंधकांचे आहे,हे कार्यालय फक्त त्यांनी मागणी केल्याप्रमाणे मुद्रांक पुरवठा करते- सागर संत (उप कोषागारी,कल्याण)

*'अनाधिकृत मुद्रांक विक्रेत्यांचे सोडा,पण स्वतः ला अधीकृत महणवणारे देखील जादा पैसे घेतात,यांच्या वर कारवाई व्हायला हवी, -संतोष शेलार, उपजिल्हाध्यक्ष ,राष्ट्रवादी काँग्रेस सेवादल.

No comments:

Post a Comment

प्रधानमंत्री इंटर्नशीप योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची अर्जप्रक्रिया सुरु !

प्रधानमंत्री इंटर्नशीप योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची अर्जप्रक्रिया सुरु ! पुणे, प्रतिनिधी : भारतातील युवा वर्गाला आंतरवासितेच्या (...