गुणवत्ता वाढीस चालना देणारा ध्वजारोहणाचा ; भादाणे उपक्रम !!
राज्यात प्रथमच जिल्हा परिषद शाळेमध्ये झेंडावंदन व ध्वजारोहणाचा मान विद्यार्थ्यांना देण्याचा क्रांतिकारी निर्णय मा सरपंच. "संजय हांडोरे पाटील" यांच्या प्रयत्नातून झाल्याने या निर्णयाचे स्वागत.. राज्यभरात होत असून "ध्वजारोहणाचा भादाणे उपक्रम" सर्व राज्यात लागू करावा अशी मागणी लोकप्रतिनिधी, राजकीय पक्ष व विविध सामजिक संघटनांच्या माध्यमातून शासनाकडे होत आहे...
जिल्हा ठाणे मुरबाड तालुक्यातील भादाणे गावात १५ ऑगस्ट २०१५ मध्ये सुरू झालेली ही अनोखी व प्रेरणादाई संकल्पना आज गावातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासाला चालना देणारी आणि त्यांच्या आई वडिलांना मान सन्मान देणारी ठरली आहे. त्याच बरोबर गावातील झेंडावंदन करण्यावरून होणारे वाद; हेवेदावे; तसेच प्रत्येक गावात चालत आलेली खोट्या श्रेयवादाची परंपरा; रुसवे फुगवे; या सर्व वाईट प्रथांना चपराक देणारी ठरली आहे. आदर्श निवडणूक आचारसंहिता काळात ध्वजारोहण करताना गावातील कोणत्या व्यक्तीला झेंडावंदनाचा मान द्यावा हा प्रश्न शिक्षका समोर समोरील कायमचा या निर्णयामुळे सुटला आहे. राष्ट्रीय सण साजरे करत असताना देशभक्ती शिकवायची की झेंडावंदन चालू असताना वाद मिटवावेत या द्विधा मनःस्थितीत असलेल्या शिक्षकांना फार मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. प्रत्यक्ष झेंडावंदन चालू असताना किंवा ध्वजारोहण कोणाच्या हस्ते करायचे यावरून काही दिवस गावात वादाचे राजकारण चालू असायचे, त्याचा विद्यार्थ्याच्या मनावर फार मोठा परिणाम होत असे.
*या अनोख्या निर्णयामुळे गावातील गलिच्छ राजकारण व वादाच्या समस्या कायमच्या निकाली निघाल्या आहेत*.
"विद्यार्थ्यांच्या निकोप वाढीकरिता"; "गुणवत्ता विकासाकरिता" व गावातून प्रथम क्रमांकाने पाल्य उत्तीर्ण होण्याकरिता भरपूर मेहनत घेणाऱ्या पालकांकरिता हा झेंडावंदन व ध्वजारोहणाचा क्रांतिकारी निर्णय घेणारे भादाणे गावाचे सुपुत्र संजय हांडोरे पाटील यांनी अनेक अश्या सुंदर संकल्पनां गावाकरिता प्रत्यक्षात राबविल्या आहेत. तसेच या निर्णयाची अंमलबजावणी करताना तत्कालीन मुख्याध्यापक राजाराम कंटे सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले होते. सध्या कार्यरत असलेले या शाळेचे मुख्याध्यापक डॉ.आवार सर व त्यांचे सहकारी शिक्षक या ध्वजारोहणाचा आनंद द्विगुणित करण्या करिता विविध उपक्रम व ग्रामस्थांच्या सहभाग वाढविण्यास सुंदर असे नियोजन करतात.
या वर्षीचा स्वातंत्र्यदिनाचा ध्वजारोहण व ध्वजवंदन करण्याचा मान इयत्ता दहावी परीक्षेत ९०% गुण प्राप्त करून भादाणे गावातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण विद्यार्थिनी कुमारी कू.अंकिता विजय शेलवले हिच्या हस्ते व तिच्या आई वडिलांच्या सोबत मिळणार आहे*.
*आतापर्यंतचे झेंडावंदन व ध्वजारोहणाचे मानकरी*.....
*१) विशाल रामचंद्र शेलवले(१५ ऑगस्ट २०१५ एसएससी)*
*२) अमित नारायण यशवंतराव(२६ जानेवारी २०१६ एचएससी)*
*३) स्वराज ज्ञानेश्वर शेलवले(१५ ऑगस्ट २०१६ एसएससी)*
*४) विद्या बाळकृष्ण शेलवले(२६जानेवारी२०१७ एचएससी)*
*५) भावेश गोविदं शेलवले(१५ ऑगस्ट२०१७ एसएससी)*
*६) भावना जयवंत सोनावळे(२६ जानेवारी २०१८ एचएससी)*
*७) भुषण चितांमण शेलवले(१५ ऑगस्ट२०१८ एसएससी)*
*८) स्वराज ज्ञानेश्वर शेलवले(२६ जानेवारी २०१९ एचएससी)*
*९) अक्षदा नारायण यशवंतराव(१५ ऑगस्ट२०१९ एसएससी)*
*१०)कल्पना गौतम धनगर (२६जानेवारी २०२० एचएस सी)*
*११),साहील जयवंत शेलवले.(१५ऑगस्ट २०२० एस एस सी)*
*१२).भक्ती दिपक हांडोरे (२६ जानेवारी २०२१ एचएससी)*
*१३)अंकिता विजय शेलवले( १५ऑगस्ट २०२१)*
*या अनोख्या व क्रांतिकारी निर्णयाचे स्वागत संपूर्ण राज्यात जिल्हा परिषद शाळांमध्ये होत असून ठाणे जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतीने या पॅटर्नचे अनुकरण करून शिवळे उमरोली (पी). मडकेपाडा खेवारे, इंदे, उचले, भिवंडी येथील सांगे नांदकार, शहापूर येथील शिळ, नांदगाव या गावांनी गुणवत्ता वाढीच्या या उपक्रमास् सुरवात केली आहे..*
*ही संकल्पना प्रत्यक्षात साकारणारे "संजय हांडोरे पाटील" यांचे सर्व स्तरातून कौतुक होते.* आहे*.
"संजय हंडोरे पाटील" : 7745048505 / 9421540007
खूप छान उपक्रम आहे अशी माणसे आपल्या आजूबाजूला असली की काही कमी पडणार नाही आणि खूप ऊर्जा आणि प्रेरणा मिळेल साहेब असे उपक्रम कायम सुरू ठेवा
ReplyDeleteVery nice idea.I heartily appreciate this idea .Every school should follow this example.
ReplyDelete