Friday, 13 August 2021

शिवशक्ति उत्कर्ष मंडळ कासार कोळवणची कार्यकारणी जाहीर ! "अध्यक्षपदी रविंद्र सि.करंबेळे यांची तर सचिव पदी शैलेश दळवी आणि खजिनदारपदी राजेंद्र करंबेळे यांची निवड"

शिवशक्ति उत्कर्ष मंडळ कासार कोळवणची कार्यकारणी जाहीर !

"अध्यक्षपदी रविंद्र सि.करंबेळे यांची तर सचिव पदी शैलेश दळवी आणि खजिनदारपदी राजेंद्र करंबेळे यांची निवड"


मुंबई, (शांत्ताराम गुडेकर /मोहन कदम) :
             महाराष्ट्राची भूमि ही संत, महात्मे आणि पराक्रमी पुरुषांची भूमि आहे। संत ज्ञानदेव, तुकाराम महाराज आदी अनेक संतानी भक्तिमार्गाची शिकवण दिली आणि समाजाला एकत्रित करून माणूसकिचा धर्म शिकविला. राजर्षि शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले यांनी अशिक्षित आणि अन्यायाने पिचत पडलेल्या समाजाला त्यांच्या हक्काचे जगणे शिकविले, आणि छत्रपति शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांनी राष्ट्रभक्ति आणि राष्ट्रप्रेमाचा आदर्श घालून दिला. हे सर्व कार्य एकट्याने होत नाही त्यासाठी एकात्मतेची भावना असावी लागते. जशी लहान-मोठी पाचही बोटे मिळून वज्रमूठ होते त्याप्रमाणे समाजातील सर्व लहान-मोठे घटक मिळून एका संकल्पाने एका प्रेरणेने एक विकासात्मक दृष्टिकोंन समोर ठेऊन संघटना तयार होते, आणि आपल्या प्रगतीचे एक एक पाऊल पुढे पुढे जात टप्प्या-टप्प्याने आपले ध्येय निश्चित करते. अशा प्रकारचे विलक्षण कार्य रत्नागिरी जिल्ह्यातील, देवरूख पंचक्रोशिमध्ये श्री क्षेत्र मार्लेश्वर परिसरातील कासारकोळवण या गावामधील शिवशक्ति उत्कर्ष मंडळ, कासार कोळवण या सरकारमान्य रजि. संस्थेने केले आहे. कोंकणातील दुर्गम भागात  सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेले हे छोटेशे गाव.शंभो श्री मार्लेश्वर देवस्थानाच्या पवित्र भूमित. श्री सोंबा देवाच्या आशिर्वादाने सामाजिक विकासाची आणि जनहिताची कामे हाती घेऊन सामाजिक क्रांति केली आहे, आणि आपली विशिष्ठ ओळख निर्माण केली आहे. मंडळाच्या त्याच कार्याची दखल घेऊन, प्रभावित होऊन मंडळाला आजवर राष्ट्रीय, राज्यस्तरीय, जिल्हा स्तरीय अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. श्रीशिवशक्ती उत्कर्ष मंडळ कासार कोळवण या मंडळाची सभा नुकतीच मोहन कदम यांच्या मालाड येथील निवासस्थानी पार पडली. सभेला एकूण ५२ सदस्यांची उपस्थिती लाभली. कोरोना संकटावर मात करत व प्रवासाच्या गैरसोयीचा सामना करत बहुसंख्खेने उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे मन:पूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. सभेत नविन कार्रकारिणी निवड (२०२१-२०२६) करण्यात आली. अध्यक्षपदी-रविंद्र सि.करंबेळे तर उपाध्यक्ष-महेंद्र दळवी, सचिव-शैलेश दळवी, उपसचिव-अंतुल तोरस्कर, खजिनदार-राजेंद्र करंबेळे, उपखजिनदार-उदय गुरव, हिसोब तपासणीस म्हणून संदिप तोरस्कर तर सल्लागार म्हणून संदेश गुरव, प्रदिप तोरस्कर, संतोष कदम, किरण तोरस्कर यांची निवड झाली.समन्वय समितीत शंकर करंबेळे, वसंत पाष्टे, गजानन करंबेळे, पत्रकार मोहन कदम, प्रकाश तोरस्कर, एकनाथ कदम, दत्ताराम तोरस्कर, सुनिल आलीम, सुधीर कल्ये, सखाराम कदम, राम तोरस्कर, नंदकुमार गुरव यांची नेमणूक करण्यात आली. तरुणांनी कार्यभाग संभाळावा ही इतक्या वर्षाची मनोकामना आज पूर्ण झाली. सर्व नवनिर्वाची पदाधिकारी, सदस्याचे मंडळाचे आजी-माजी पदाधिकारी,सदस्य व सभासद, हितचिंतक यांच्यातर्फे मन:पूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छाही देण्यात आल्या.

No comments:

Post a Comment

कल्याण परिसरात महानगर गॅस पाइपलाइनसाठी खोदकाम केल्यानंतर निकृष्ट दर्जाचा काम !

कल्याण परिसरात महानगर गॅस पाइपलाइनसाठी खोदकाम केल्यानंतर निकृष्ट दर्जाचा काम ! ** कल्याण परिसरात धुळीमुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात ...