Wednesday, 5 March 2025

कल्याण परिसरात महानगर गॅस पाइपलाइनसाठी खोदकाम केल्यानंतर निकृष्ट दर्जाचा काम !

कल्याण परिसरात महानगर गॅस पाइपलाइनसाठी खोदकाम केल्यानंतर निकृष्ट दर्जाचा काम !

** कल्याण परिसरात धुळीमुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात

कल्याण, प्रतिनिधी - कल्याण शहरातील विविध भागात महानगर गॅस पाइपलाइने टाकण्यासाठी मागील २-३ वर्षांपासून खोदकाम सुरू आहे, कल्याण मधील सोसायटी परिसरात अनेक ठिकाणी खोदकाम करून पाइपलाइन टाकल्यानंतर त्यावर पुन्हा वापरण्यात आलेले सिमेंट अतिशय निकृष्ट दर्जाचे व सिमेंट कमी भूसा वापरण्यात आला असून त्यामुळे सोसायटी परिसरात धुळ उडत असून त्यामुळे अनेक नागरिकांना खोकला व घसा खवखवणे असे आजार सुरू झाले आहेत. 
सदर संबंधित व्यवस्थापन व अधिकारी यांना संपर्क केला असता फोन उचलत नाही, याबाबत नागरिकांच्या तक्रारीनुसार स्फूर्ती फाउंडेशन ने कल्याण डोंबिवली महानगरपालिका आरोग्य विभागाकडे याबाबत तक्रार केली असून तिकडून अजूनही कोणताच प्रतिसाद मिळाला नसून, महानगर गॅस पाइपलाइने टाकण्यासाठी खोदकाम करत आहे परंतु हे करत असताना नागरीकांना यांचा त्रास होणार नाही, तसेच कल्याण शहरात ठिकठिकाणी खोदकाम मुळे वाहतूक अडचण होत ते काम त्वरित मार्गी लावावे नागरीकांना गॅस पाइपलाइन सुविधा लवकरात लवकर सुरू करून द्यावी अशी मागणी स्फूर्ती फाउंडेशन अध्यक्ष बजरंग तांगडकर व शिल्पा तांगडकर यांच्या वतीने करण्यात आली आहे.
प्रतिक्रिया -

१) बजरंग तांगडकर (सचिव - शंखेश्वर प्रेसिडेन्सी फेडरेशन / अध्यक्ष - स्मृती फाऊंडेशन) महानगर गॅस पाइपलाइनचे आतापर्यंत २ वेळा घरातील छोटी पाइपलाइन व मोठी गॅस पाइपलाइन रस्त्यावर टाकताना खोदकाम केले हे खोदकाम केल्यानंतर पुन्हा सिमेंटीकरण करताना अतिशय निकृष्ट दर्जाचे ज्यामध्ये सिमेंट न वापरता सफेद भुसा वापरला त्यामुळे सगळीकडे धुळी उडत आहे, नागरिकांच्या घरांमध्ये जात आहे, नागरीकांना खोकला, घसा खवखवणे असे आजार सुरू झाले असून‌ नागरीकांनी तक्रार केल्यानंतर स्फूर्ती फाउंडेशन माध्यमातून कल्याण डोंबिवली महानगरपालिका आरोग्य विभागाकडे तक्रार केली आहे, त्यांच्या उत्तराची वाट पाहत आहे, महानगर गॅस पाइपलाइन व्यवस्थापन अधिकारी फोन उचलत नाही आहे, लवकरात दुरुस्ती केली नाही नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न वर संबंधित व्यवस्थापनावर कायदेशीर कारवाई केली जाईल याला‌ जबाबदार महानगर गॅस व्यवस्थापन अधिकारी व कर्मचारी असेल.

२) दिलीप सिंग (खजिनदार - शंखेश्वर प्रेसिडेन्सी फाउंडेशन) महानगर गॅस पाइपलाइन काम करण्यासाठी संबंधित व्यवस्थापन सुरुवातीला खोदकाम करण्यापूर्वी सर्व काही जसे असेल तसे करून देऊ असे बोलले होते, परंतु काम झाल्यानंतर अतिशय खराब काम केले व ज्या लाद्या, पेवरब्लाॅक तुटले ते बसवून दिले नाही व नंतर आता सोसायटीने स्वखर्चाने ते आणून मग आम्ही लावून घ्या अशी उत्तरे मिळाली.

No comments:

Post a Comment

कल्याण परिसरात महानगर गॅस पाइपलाइनसाठी खोदकाम केल्यानंतर निकृष्ट दर्जाचा काम !

कल्याण परिसरात महानगर गॅस पाइपलाइनसाठी खोदकाम केल्यानंतर निकृष्ट दर्जाचा काम ! ** कल्याण परिसरात धुळीमुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात ...