Wednesday, 5 March 2025

मराठमोळं मुलुंडतर्फे महिला दिनानिमित्त खुमासदार कार्यक्रम !

मराठमोळं मुलुंडतर्फे महिला दिनानिमित्त खुमासदार कार्यक्रम !
मुंबई, (पंकजकुमार पाटील): ** मराठमोळं मुलुंड च्या वतीने " महिला दिनानिमित्त " एका खुमासदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शनिवार, दिनांक १५ मार्च रोजी संध्याकाळी ५ वाजता जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र, चिंतामणराव देशमुख उद्यानाजवळ ,मुलुंड (पूर्व), मुंबई येथे होणार आहे.
     यावेळी नामवंत लेखकांच्या हलक्या फुलक्या तसेच विनोदी कथांचा रंजक आविष्कार "कथामंजिरी" हा कार्यक्रम सौ मंजिरी देवरस सादर करणार आहेत. तसेच यावेळी सर्व वयोगटातील महिलांसाठी मनोरंजनात्मक खेळसुद्धा ठेवण्यात आले आहेत. हा कार्यक्रम विनामूल्य असून सर्व स्त्री-पुरुषांना आग्रहाचे  आमंत्रण आयोजकांमार्फत देण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

प्रधानमंत्री इंटर्नशीप योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची अर्जप्रक्रिया सुरु !

प्रधानमंत्री इंटर्नशीप योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची अर्जप्रक्रिया सुरु ! पुणे, प्रतिनिधी : भारतातील युवा वर्गाला आंतरवासितेच्या (...