Friday, 13 August 2021

सर्पदंश झालेल्या ज्ञानेश्वरीला वाचवण्यात मोठे योगदान असलेल्या पोलीस अंमलदार अनंत घरत यांचे धनराज गायकवाड यांच्या कडून स्वागत...

सर्पदंश झालेल्या ज्ञानेश्वरीला वाचवण्यात मोठे योगदान असलेल्या पोलीस अंमलदार अनंत घरत यांचे  धनराज गायकवाड यांच्या कडून स्वागत... 


       बोरघर / माणगांव,  (विश्वास गायकवाड) : गुरुवार दिनांक 12/08/2021 रोजी तळा तालुक्यातील रोवळा येथे राहणारी कुमारी ज्ञानेश्वरी रमेश शिगवण या अठरा वर्षांच्या तरुणीला गुरांच्या गोठ्यात घोणस जातिच्या अत्यंत  विषारी सापाने दंश केल्याने तीला प्राथमिक उपचाराकरीता ग्रामीण रुग्णालय तळा येथे आणले असता तिच्यावर तेथील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून तिला ताबडतोब उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे नेण्यास सांगितले. 
     परंतु त्या वेळेस तळा येथील  अॅम्ब्युलन्स दुसऱ्या पेशंटला घेऊन गेल्याने अॅम्ब्युलन्स उपलब्ध नसल्याने कर्तव्यदक्ष आणि कर्तव्य तत्पर पोलीस अंमलदार अनंत प्रभाकर घरत तळा पोलीस ठाणे यांनी समयसूचकता दाखवून त्या सर्पदंश बाधीत मुलीस क्षणाचाही विलंब न लावता आपल्या स्वतःच्या गाडीत घेऊन माणगाव जिल्हा रुग्णालय येथे दाखल करून तिच्यावर माणगांव उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉक्टर प्रदिप इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णालयातील डॉक्टर ऐश्वर्या गायकवाड यांनी तात्काळ उपचार केले. त्यामुळे तिचे अनमोल प्राण वाचवण्यात त्यांना यश आले. 
    तसेच तळा पोलीस ठाण्यातील कर्तव्य दक्ष पोलीस अंमलदार अनंत प्रभाकर घरत यांनी ज्ञानेश्वरी ला तळा येथून वेळेत माणगांव उपजिल्हा रुग्णालयात विषारी सर्पदंश बाधीत कुमारी ज्ञानेश्वरी शिगवण हीला वेळेत दाखल करून तिच्यावर तात्काळ योग्य उपचार करण्यात आल्यामुळें तीला डॉक्टरांनी मृत्यू च्या दारातून परत आणून जीवदान दिले असून आता तिची तब्येत व्यवस्थित आहे. 
     त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाचे तळा तालुका चिटणीस, लोकप्रिय नेतृत्व श्री धनराज गायकवाड व आर डी सी बँकेचे संचालक श्री ज्ञानेश्वर भोईर यांनी तळा पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस अंमलदार श्री अनंत घरत यांचे मुलीचे प्राण वाढवल्यामुळे त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आभार व्यक्त केले.

No comments:

Post a Comment

कल्याण परिसरात महानगर गॅस पाइपलाइनसाठी खोदकाम केल्यानंतर निकृष्ट दर्जाचा काम !

कल्याण परिसरात महानगर गॅस पाइपलाइनसाठी खोदकाम केल्यानंतर निकृष्ट दर्जाचा काम ! ** कल्याण परिसरात धुळीमुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात ...