Thursday, 2 September 2021

ठाकूरपाडा गोवेली तेथे गंगा अवतरली, अखेरीस आदिवासी बांधवांना बोरवेलचे शुद्ध पाणी मिळाले, समाधान व्यक्त !!

ठाकूरपाडा गोवेली तेथे गंगा अवतरली, अखेरीस आदिवासी बांधवांना बोरवेलचे शुद्ध पाणी मिळाले, समाधान व्यक्त !!


कल्याण, (संजय कांबळे : )कल्याण मुरबाड महामार्गापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या गोवेली ग्रामपंचायत हद्दीतील ठाकूरपाडा ही आदिवासी वस्ती गेल्या वर्षभर बोरवेल नादुरुस्त असल्याने इतरत्र वनवन भटकून अशुद्ध पाणी पित होते. 


परंतु पत्रकार संजय कांबळे यांचा पाठपुरावा व कल्याण पंचायत समितीच्या पाणी पुरवठा विभागाचे तत्परतेमुळे अखेरीस येथील आदिवासी बांधवांना बोरवेलचे शुद्ध पाणी आज प्यायला मिळाले असून त्यामुळे येथील ग्रामस्थांनी या सर्वांचे आभार मानून समाधान व्यक्त केले.


कल्याण तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या गोवेली ग्रामपंचायत हद्दीत ठाकूरपाडा ही आदिवासी समाजाची वस्ती आहे. ४०/५० लोकवस्तीच्या या वाडीत गेल्या वर्षी टंचाई कृती आराखडयातून एक बोरवेल खोदण्यात आली होती. सुदैवाने १५० फुटांचे आसपास पाणी ही लागले होते. परंतु एक ते दोन महिन्यातच ही बोरवेल नादुरुस्त झाल्याने ती बंद पडली, त्यामुळे येथील महिलांना पाण्यासाठी इतरत्र वनवन भटकावे लागत होते. ही अडचण येथील ग्रामस्थ गणपत लुखा हिंदोळे, गुरुनाथ हिंदोळे, आदींनी स्थानिक नेते, लोकप्रतिनिधी यांना सांगितले होती. परंतु त्यांनी याकडे दुर्लक्ष केले होते. म्हणून वरील सर्व मंडळी पत्रकार संजय कांबळे यांना भेटून यामध्ये लक्ष घालण्याची विंनती केली. त्यांनी ताबडतोब ठाकूरपाडा येथे भेट देऊन तेथूनच भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या कर्मचारी/अधिकारी यांना संपर्क साधून अडचण सांगितली.


या विभागाचे मदतनीस आर व्ही लव्हाटे यांनी ही तत्परतेने ठाकूरपाडा येथे भेट देऊन काम हाती घेतले. परंतु गेली दोन दिवस मुसळधार पावसामुळे काम करणे अडचणीचे होते. आज अखेरीस पावसाने उघडीप दिल्याने येथील तरुण मंडळी यांच्या सहकार्याने बोरवेल दुरुस्तीचे काम हाती घेतले. यामध्ये मदतीसाठी ठाकूरपाडा येथील संतोष मंगल हिंदोळे, विलास हिंदोळे, राहूल बुधाची हिंदोळे, अक्षय विठ्ठल हिंदोळे, दिनेश हिंदोळे, अरुण हिंदोळे, जितू कालोखे, सुरेश हिंदोळे, राहूल हिंदोळे, विशाल हिंदोळे, महिला मध्ये रेश्मा हिंदोळे, कमल बुधाची हिंदोळे, गुलाब हिंदोळे, रंजना गणपत हिंदोळे, आदींचा समावेश होता. एकदिड तासाच्या मेहणतीनंतर बोरवेल दुरुस्ती झाली आणि गेल्या एक वर्षांपासून भूगर्भात गायब झालेले पाणी(गंगा) जमीनीवर अवतरली, हे बघून येथील वयोवृद्ध बाका हशा सांवत यांच्या डोळे पाण्याने भरले ते भारावून सर्वाचेच पाय धरुन आभार मानू लागले. हा प्रंसग मन हेलावून टाकणारा होता. पाणी व येताच त्याची अगदी विधीवत पुजा अर्चा करुन श्रीफळ फोडून महिलांनी पाणी भरण्यास सुरुवात केली.यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान अवर्णनीय होते.

यानंतर जिल्हा परिषद शाळा ठाकूरपाडा येथे एका छोटे खाणी कार्यक्रमात ठाकूरपाडा ग्रामस्थांच्या वतीने कल्याण पंचायत समितीचे पाणी पुरवठा विभागाचे आर व्ही लव्हाटे यांना शाल श्रीफळ देऊन पत्रकार संजय कांबळे यांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला व तत्परतेने काम केल्याबद्दल आभार माणन्यात आले. यावेळी शाळेच्या शिक्षिका श्रीमती कविता बांबले, महिला मंडळाच्या रंजना हिंदोळे, रेश्मा हिंदोळे, गुलाब गुरुनाथ हिंदोळे, कमल हिंदोळे, सुरेश हिंदोळे व तरुण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*प्रतिक्रिया"गेली वर्षभर आम्ही अशुद्ध पाणी पित होतो पण आता बोरवेल दुरुस्ती झाल्याने शुद्ध पाणी प्यायला मिळणार आहे" -रेश्मा हिंदोळे, ठाकूरपाडा, गोवेली.

"ठाकूरपाडा येथील तरुण मंडळी च्या मदतीमुळे हे काम ताबडतोब करता आले, यामध्ये पत्रकार संजय कांबळे यांचा पाठपुरावा महत्त्वाचा आहे" -आर व्ही लव्हाटे, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा, ठाणे.


No comments:

Post a Comment

राज्यात १ एप्रिल पासून फास्ट टॅग अनिवार्य !

राज्यात १ एप्रिल पासून फास्ट टॅग अनिवार्य ! मुंबई, प्रतिनिधी : राज्यात १ एप्रिलपासून सर्व वाहनांना टोलसाठी फास्ट-टॅग बंधनकारक कर...