भिवंडीत कामांचा भूमिपूजन - उदघाटन व बेघर आदिवासी कुटुंबाला शिवसेनेकडून पंचवीस हजाराची मदत.!!
भिवंडी, दि. 10, (अरुण पाटील) :
भिवंडी तालुक्यातील जिल्हा परिषद गट कांबे गटातील जिल्हा परिषद अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या कामांचा भूमिपूजन व उदघाटन शिवसेना उप जिल्हाप्रमुख तथा भिवंडी निजामपूर शहर महानगर पालिकेचे नगरसेवक डॉ. श्री. देवानंद थळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बालखडी या शाळेच्या वाल कंपाउंडचे उदघाटन, कुंभारपाडा येथे लघु पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन, आंबराई येथील गवारी पाडा येथे सिमेंट काँक्रीट रस्त्याचे भूमिपूजन, समाज कल्याण मार्फत आशा पाटील यांच्या घरापासून ते बाळाराम कोंढारी यांच्या घरापर्यंत पेव्हर ब्लॉक रस्त्याचे उदघाटन, तसेच जिल्हा परिषद ठाणे समाजकल्याण च्या वतीने लोक- कलाकारांना मानसी २५०० रुपये महिना अनुदान या प्रमाणे ३ कलाकारांना चेकचे वाटप करण्यात आले. या मध्ये कांबे गावातील प्रसिद्ध मूर्तिकार तुकाराम दहिलकर, कुहे गावातील आदिवासी कालाकृतीमदे उत्तम कला सादर करणारे मढवी, तसेच चिंबीपाडा येथील भोमटे यांना हे अनुदान आजीवन सुरू राहील. तसेच भिवंडी तालुक्यातील खडकी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या आमराई गावात बुधवार दि. ८/९/२०२१ रोजी) पहाटे ५:३० वाजता रामा नाऊ पडवळ यांचे घर आतिवृष्टीच्या मुसळधार पावसामुळे जमीनदोस्त झाले. ही माहिती जिल्हा परिषद ठाणे समाजकल्याण सभापती प्रकाश तेलीवरे यांना समजताच त्यांनी शिवसेना उपजिल्हा प्रमुख ठाणे (ग्रामीण) तथा भिवंडीचे नगरसेवक डॉ. देवानंद थळे यांना सांगताच त्या बेघर झालेल्या आदिवासी कुटुंबाला डॉ. श्री. देवानंद थळे यांच्या वतीने २५००० रकमेचा चेक देण्यात आला .यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना डॉ. देवानंद थळे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलतांना सांगितले की, जिथे संकट गंभीर असेल तिथे शिवसेना खंबीर असेल त्याच प्रमाणे समाज कल्याण ठाणे सभापती प्रकाश तेलीवरे यांची काम करण्याची पद्धत अतिशय चांगली असून या जिल्हा परिषद गटात अनेक कामांचा आज भूमिपूजन व उदघाटन करण्यात आले. त्यांच्या याच कामामुळे व त्यांची काम करण्याच्या पद्धतीमुळे त्यांना जिल्हा परिषदे मध्ये समाज कल्याण चे सभापती पद मिळाले आहे. महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने ते सभापती पद भुषवत असतांना त्यांच्या कामाचा सपाटा पाहता ते पद योग्य व्यक्तीला दिले आहे असे वाटते .या जिल्हा परिषद गटातील सर्व कार्यकर्त्यांचे ही त्यांनी मनापासून कौतुक केले. तसेच आज हे घर जमीनदोस्त झाले आहे त्या करिता अजून काही मदत लागल्यास शिवसेना नक्कीच करेल असे सांगितले. समाजकल्याण ठाणे सभापती प्रकाश तेलीवरे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की बेघर झालेल्या कुटुंबाला सर्व ती मदत मी माझ्या प्रमाणे करेन तसेच सदर घटनेची माहिती भिवंडी तहसीलदार अधिक पाटील, गटविकास अधिकारी घोरपडे, तसेच तलाठी यांच्याशी संपर्क साधून सरकारी पंचनामे करण्यास सांगितले आहे. तसेच हे घर जमीनदोस्त झाले आहे त्याचे काम उद्यापासून सुरू करण्यात येईल असेही सांगितले, तसेच शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख (ग्रामीण) प्रकाश पाटील, उप जिल्हा प्रमुख देवानंद थळे, धर्मवीर मित्र मंडळाचे अध्यक्ष सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे, तालुका प्रमुख विश्वास थळे ,भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे, भिवंडी पूर्वचे माजी आमदार रुपेश म्हात्रे, यांचे त्यांनी विशेष आभार मानले. या जिल्हा परिषद गटातील सर्व कार्यकर्त्यांचे व पदाधिकाऱ्यांचे विशेष आभार मानले तसेच देवानंद थळे यांनी रामा पडवळ यांना २५००० ची मदत केली त्या बद्दल मी मनापासून त्यांचे आभार मानतो.
या उदघाटन व भूमीपूजन सोहळ्यास शिवसेना उप जिल्हा प्रमुख तथा भिवंडीचे नगरसेवक डॉ .देवानंद थळे, ठाणे जिल्हा परिषदेचे समाजकल्याण चे सभापती प्रकाश तेलीवरे, शिवसेना तालुका सचिव राजेंद्र काबाडी, शिवसेना उप तालुका प्रमुख श्रीधर खारीक, भिवंडी पंचायत समितीचे माजी सदस्य बबन पाटील ,जिल्हा परिषद कांबे गटाचे संपर्क सचिव राजेंद्र पाटील ,ग्रामपंचायत सदस्य दत्ता शिकारी, शिवसेना समाजसेवक नरेनभाई गोराडकर, माजी तंटा मुक्त अध्यक्ष टेंभवली शेखर भोईर, राम भोसले, शशिकांत म्हात्रे, प्रकाश भोईर, महेंद्र म्हात्रे, स्वीव सहायक शैलेश मांजरेकर ,कांबे गणाचे सचिव कामनकर ,शाखाप्रमुख संजय वारघडे, मायकल जाधव, योगेन डावरे ,किसन गवारी, गणेश शिकारी, नारायण पाटील, बाळाराम कोंढारी, कल्पेश पाटील, रोशन भोई, अविनाश खारीक, अमित घुडे, शरद काटसकर, पोलीस पाटील श्री.देवनाथ पडवळ, विठ्ठल पडवळ, नारायण पडवळ,बाळकृष्ण पडवळ, गजानन गवारी, चंद्रकांत गवरी ,गोविंद काटस्कर, रतन पडवळ, रूपेश पडवळ, तसेच आमराई ग्रामस्थ, जिल्हा परिषद कांबे गटातील सर्व पदाधिकारी व आसंख्य शिवसैनिक, भारतीय विद्यार्थी सेना, युवा सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवसेनेच्या माध्यमातून पडवळ कुंटुबाला मदत मिळावी यासाठी चिंबीपाडा शाखाप्रमुख श्री.मायकल जाधव, शिवसेना समाजसेवक श्री.नरेन भाई गोराडकर, स्थानिक शिवसेना कार्यकर्त्ये श्री. बाळाराम कोंडाजी यांनी विशेष मेहनत घेतल्याने पडवळ कुटुंबाने त्यांचे विशेष आभार मानले.
या वेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री. राजेंद्र पाटील यांनी केले.
No comments:
Post a Comment