महिलेची छेड काढणाऱ्याला शिकवल धडा - "सौ. सुवर्णा ताई कानवडे"
कल्याण : मानवी अन्याय निर्मूलन संघटनेचे ठाणे जिल्हा निरीक्षक महिला पदाधिकारी याना व ठाणे जिल्हा संघटक गौरी शिरसागर याना शिवाजी आव्हाड याने विवाहित महिलेला सोशल मीडियावर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून मैत्री करण्याची मागणी केली. व आपण संघटनेचे खूप छान काम करत आहात मला तुमचे काम खूप आवडतं आहे.
मी मंत्रालयात कामाला आहे. तुमचे काही काम असेल तर मला नक्की सांगा मी तुमची नक्की मदत करत जाईल व तुम्हाला शासनाचे सर्व योजना मिळवून देत जाईल पण तुम्हाला माझ्या पण आपेक्षा पूर्ण करावे लागतील तर मी तुमचे काम करत जाईल. आपण सोबत काम करू तुमच्या आपेक्षा मी पूर्ण करतो माझ्या अपेक्षा तुम्ही पूर्ण करा अशी मागणी करत आव्हाड महिला पदाधिकारी भालेराव याना सतत व्हिडिओ कॉल करून त्रास देण्यास लागला व फोन वर तुमचं वय काय विचारले असता महिलेने तुम्ही सागा सागितले असता तुम्ही पूर्ण शरीर दाखवलं नाही मला पूर्ण शरीर दाखवा मग नक्की सांगेल व तुमचा फिगर किती आहे ? तुझ्या फिगर ची साईज काय असे अश्लील संभाषण करत भालेराव ह्यांना भेटण्यासाठी आमंत्रण केले. भालेराव यांनी तत्काळ ही बातमी मानवी अन्याय निर्मूलन संघटनेच्या ठाणे जिल्हा अध्यक्ष सौ सुवर्णा ताई कानवडे यांच्या निर्दशनास आणून दिले असता संघटनेच्या महिला पदाधिकारी यांनी सापळा रचून सोशल मीडिया माध्यमाने काम करणाऱ्या महिला पदाधिकारी याना मंत्रालयात कामाला आहे तुम्हाला योजनेचे लाभ मिळवून देतो म्हणून महिले सोबत मैत्री करून तिचा गैर फायदा घेणाऱ्या नराधमाला धडा शिकविण्यासाठी व अश्या नराधमाला कायदेशीर शिक्षा मिळावी पोलिसांचा ताब्यात देण्यासाठी मानवी अन्याय निर्मूलन संघटनेच्या पदाधिकारी यांनी सापळा रचला. कल्याण पश्चिम येथील दीपक हॉटेल येथे भेटण्यास आलेल्या शिवाजी आव्हाड याला त्याच्या भाषेत संघटनेच्या महिला पदाधिकारी यांनी रोमियो गिरी शिकवली फेसबुक च्या माध्यमाने महिले सोबत अश्लील संभाषण करणाऱ्या व मंत्रालयात कामाला आहे आपणास योजना मिळवून देतो म्हणून महिला पदाधिकारी याचा गैर फायदा घेणाऱ्या आव्हाड याला पोलिसांच्या ताब्यात दिले. कल्याण महात्मा फुले पोलीस स्टेशन येथे आव्हाड याच्यावर दिनाक गुन्हे क्रमांक 159/2021 अन्वये भारतीय दंड संहिता कलम 504,506 व प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. सदर महिलेला सोशल मीडिया च्या माध्यमाने खोट्या आमिष दाखवून महिलेचा गैर फायदा घेणाऱ्या नराधमाला कठोर शिक्षा मिळावी ह्यासाठी मानवी अन्याय निर्मूलन संघटना रोड रोमियो, वासना धारी राक्षस महिलेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला गदा निर्माण करणाऱ्या नक्की धडा शिकवू प्रत्येक महिलेला आपल्या मनानुसार आयुष्य जगण्याचा अधिकार असताना देखील आपले विचार सोशल मीडियावर निर्भिडपणे व्यक्त करणाऱ्या महिला व युवती यांना बनावट पाठींबा देत वासना ठेवत महिलेशी संपर्क वाढविणाऱ्या प्रत्येक नराधमाला संघटनेशी गाठ आहे. जर अश्या महिला व युवती हिचा गैरफायदा घेत तिच्याशी संपर्क करून वासनेची अपेक्षा ठेवत असणाऱ्या प्रत्येक नराधमाला भर चौकात तुडवू, महिला युवती कोणाच्या बापाची जहागीर नाही प्रत्येक महिलेला युवतीला सोशल मीडियावर तिच्या मनासारखा वागण्याचा अधिकार आहे. पण सोशल मीडियावर चांगल्या पोस्ट टाकणाऱ्या महिले बदल मनात वासना ठेवून गैरफायदा घेणाऱ्या नराधमाला भर चौकात नक्की धडा शिकवू वासनेसाठी महिलेला खोट्या आमिष फुस लावणाऱ्या नराधमाला कठोर शिक्षा मिळावी यासाठी संघटना खंबीरपणे उभी आहे. महिलेचा गैर फायदा घेणारे वासना धारी राक्षस आपल्या आजूबाजूला असतील शासन आपणास योग्य मदत करत नसेल तर अशा नराधमाची तक्रार नक्की संघटनेकडे करा अशा नराधमांना संघटना नक्की कायदेशीर कठोर शिक्षा व्हावी यासाठी पुढाकार घेणार आहे. त्यासाठी संघटनेने राज्यभरात मोहीम सुरू केली आहे. संघटनेने ठाणे जिल्ह्यात मोठी भूमिका घेत महिला संरक्षण या विषयावर मोठी चळवळ सुरू केली आहे. त्यासाठी ठाणे जिल्ह्यात संघटनेची मोठी टीम निर्माण केली आहे.सौ सुवर्णा ताई कानवडे ठाणे जिल्हा अध्यक्ष, शैनाज खत्री ठाणे जिल्हा सचिव. गौरी क्षिरसागर -ठाणे ग्रामीण जिल्हा संघटक, निशा क्षिरसागर, ठाणे जिल्हा उपसचिव, ठाणे ग्रामीण जिल्हा सचिव सोनी जयस्वाल, सौ. अश्विनी भालेराव ठाणे जिल्हा (ग्रामीण) उपनिरीक्षक, मुरबाड- बदलापूर -अंबरनाथ ठाणे जिल्हा विभाग निरीक्षक -सौ हेमा गाडे, भिवंडी ठाणे ग्रामीण उप विभाग (कल्याण बदलापूर - अंबरनाथ) संघटिका सौ श्रेयशी लटके, तालुकाध्यक्ष सौ वृषाली भोईर, कल्याण तालुकाध्यक्ष - सौ. रईसा तांबे कल्याण संघटीका सुनीता खैरनार, ठाणे जिल्ह्यात महिलेवर होणाऱ्या अन्याय अत्याचार विरोधात लढा देण्यासाठी संघटनेनं टीम तयार केली आहे. महिलेवर अन्याय करणाऱ्या वर कायदेशीर कठोर शिक्षा व्हावी यासाठी संघटना मोठ्या प्रमाणात पुढाकार घेणार आहे. सोशल मीडियावर मैत्री करून अश्लील संभाषण करणाऱ्या वासना धारी आव्हाड त्याची अजून किती महिलेसोबत अश्लील संभाषण करून महिलेचा गैरफायदा केल्याबाबत चौकशी करण्याची मागणी संघटने तर्फे करण्यात येणार आहे. असे संघटनेच्या "जिल्हा अध्यक्ष सौ. सुवर्णा ताई कानवडे" यांनी माहिती दिली आहे.
No comments:
Post a Comment