Thursday, 9 September 2021

छगन भुजबळ दोषमुक्त झाल्यावर पहिली प्रतिक्रिया, 'सत्य परेशान हो सकता है पराजित नही'

छगन भुजबळ दोषमुक्त झाल्यावर पहिली प्रतिक्रिया, 'सत्य परेशान हो सकता है पराजित नही'


भिवंडी, दिं.10, अरुण पाटील (कोपर) :
        महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना दोषमुक्त करण्यात आले आहे. मुंबई सत्र न्यायालयाने या संदर्भातील निकाल दिला आहे. न्यायालयाने दिलेल्या या निकालानंतर छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत आपली प्रतिक्रिया दिली आहे. 'सत्य परेशान होता है पराजित नही' अशी प्रतिक्रिया भुजबळांनी दिली आहे.
             महाराष्ट्र सदन प्रकरण जगभर गाजलं. जे महाराष्ट्र सदन फाईव्ह स्टार हॉटेल सारखं बांधलं गेलं त्याचा वापर अनेक राजकीय पक्ष करत आहेत. अंधेरी आरटीओ ऑफिस पण तसेच बनवण्यात आलं. कंत्राटदाराला 1 फूट जमीन किंवा एफएसआय मिळालेला नाहीये. 800 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. जनतेच्या आशीर्वादामुळेच दोषमुक्त झालो.
         ज्यांना हायकोर्टात जायचं आहे त्यांनी खुशाल जावं असं म्हणत छगन भुजबळ यांनी अंजली दमानींया यांना उत्तर दिलं आहे. मुंबई सत्र न्यायालयाने दिलेल्या या निर्णयानंतर अंजली दमानिया यांनी एक ट्विट केलं आहे. अंजली दमानिया यांनी ट्विट करत हायकोर्टात दाद मागणार असल्याचं म्हटलं आहे.
-----------------------------------------------------------------
छगन भुजबळांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे.
-----------------------------------------------------------------
         आजचा दिवस आनंद साजरा करण्याचा आहे.

ज्यांना हायकोर्टात यायचं आहे त्यांनी खुशाल जावं.

काही लोक अजूनही मला शांतपणे झोपू देणार नाही.

कंत्राटदाराला 1 फूट जमीन किंवा एफएसआय मिळालेला नाही.

जनतेच्या आशीर्वादामुळेच दोषमुक्त झालो.
आज दु:खाचा पाढा वाचणार नाही.
महाराष्ट्र सदन प्रकरण जगभर गाजलं.जे महाराष्ट्र सदन फाईव्ह स्टार हॉटेल सारखं बांधलं गेलं त्याचा वापर अनेक राजकीय पक्ष करत आहेत.

      अंधेरी आरटीओ ऑफिस पण तसेच बनवण्यात आलं.

800 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला.

2 वर्षापेक्षा अधिक काळ समीर आणि मला तुरुंगात राहावं लागलं.

या केसमधून आम्हाला वगळण्यात यावं कारण आमचा काही दोष नाही हे कोर्टाच्या निदर्शनास आणण्यात आलं.

ईडीची कारवाई यावरच आधारित आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मी आभारी आहे, की त्यांनी मला लगेच मंत्रिमंडळात घेतलं.

8 - 8 खटले कशाला टाकायचे, त्रास देण्यासाठी.मला गप्प करण्यासाठी प्रयत्न केला.

समाधानाची झोप लागेल, पण अनेकजण मला झोपू देणार नाही.

No comments:

Post a Comment

निळजे गाव येथे आई एकवीरा देवी पदयात्रा पालखी सोहळा मोठया भक्तिमय वातावरणात संपन्न ! ** ह. भ. प. श्री जितेन्द्र महाराज पाटील यांच्या कीर्तनान...