Thursday, 9 September 2021

कोरोनाच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करत वरप येथे खासदार, आमदारांच्या उपस्थित विवाह सोहळा संपन्न !!

कोरोनाच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करत वरप येथे खासदार, आमदारांच्या उपस्थित विवाह सोहळा संपन्न !!


कल्याण, (संजय कांबळे) : महाराष्ट्र, मुंबई नव्हे तर देशात शैक्षणिक क्षेत्रात अव्वल नंबर ठरलेल्या वरपगाव ता. कल्याण येथील सेक्रेट हार्ट स्कूलचे व्यवस्थापक अलबीन अंथोंनी यांचा मुलगा कु. रोहित आणि कु. जितीका हिचा विवाह सोहळा कोरोनाचे सर्व नियमाचे काटेकोर पालन करत खासदार, डॉ श्रीकांत शिंदे, आमदार कुमार आयलानी, किसन कथोरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात पार पडला.


कल्याण तालुक्यातील वरपगाव हे कल्याण मुरबाड महामार्गावर वसलेले छोटेसे गाव, या गावात सन २००० मध्ये सेक्रेट हार्ट एज्युकेशन सोसायटीचे, सेक्रेट हार्ट स्कूल सुरू झाले. या शाळेचे व्यवस्थापक अलबीन अंथोंनी यांचा दाँडगा जनसंपर्क असल्याने अगदी कमी कालावधीत ही शाळा म्हारळ, वरप, कांबा या परिसरात सर्व परिचित झाली. शिक्षणासह कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात टाॅप कोणती शाळा असेल तर ती सेक्रेट हार्ट असे समीकरणच झाले. 


२००५, २०१९, २०२१ या प्रत्येक वेळी उल्हास नदीस पूर आला तेव्हा या परिसरात संपूर्ण पुरग्रस्तांंची जबाबदारी ही या शाळेने घेतली होती. अगदी संकटाच्या काळात ही शाळा गोरगरीबांची "आधारवड" बनली होती. कोरोनाकाळात जीवनमरण डोळ्यासमोर दिसत असताना ही या परिसरातील पेंशट साठी शाळेने केलेले काम जीव वाचविणा-या डॉक्टरापेक्षा कमी नव्हते, तालुक्यातील गोरगरीब, कष्टकरी, आदिवासी बांधवाना आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून शाळेच्या परिसरात, शाईन' चँरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून लाखो लोकांना मोफत औषध उपचार केले आहे, ऐवढेच नव्हे तर कोणाला मुंबईच्या नामांकित हाँस्पिटल मध्ये उपचारासाठी जायचे असेल तर तेही काम शाळेतर्फे केले गेले आहे.


सेक्रेट हार्ट शाळेने आतापर्यंत केलेल्या शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरी बद्दल संस्थेस आतापर्यंत शेकडो पुरस्कार मिळाले आहेत, अगदी मा. कृषीमंत्री शरद पवारांपासून, खा. सुप्रिया सुळे, मा. राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, अशा अनेकांनी शाळेचे कौतुक केलं आहे. तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचापासून ते आमदार, खासदारांपर्यत सर्व या शाळेशी जोडले गेलेले आहेत. आज तालुक्यातील शेकडो लोकांना या शाळेनं रोजगार दिला आहे. त्यामुळे ही शाळा म्हणजे एक मंदिर/कौटुंबिक घर बनले आहे. अशा या शाळेच्या सर्वेसर्वा असलेल्या अलबीन अंथोंनी यांच्या सुपूत्राचा विवाह सोहळा म्हणजे समस्त तालुक्यासाठी एक पर्वणीच होती. कु. रोहित अंथोंनी हा उच्च विद्याविभूषित असून त्यांची पत्नी देखील डॉक्टर असल्याचे समजते .या दोघा उभयतांचा विवाह सोहळा चर्च मध्ये झाला तर स्वागत सोहळा शाळेच्याभव्य दिव्य पंटागणात पार पडला.


सध्या कोरोनाची परिस्थिती असल्याने शाळेने सँनिटायझर, मास्क, सोशलडिंस्टिंग आदी नियमांचे काटेकोर पालन केले होते.

यावेळी नव वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी कल्याण चे खा. डॉ श्रीकांत शिंदे, मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार किसन कथोरे, उल्हासनगरचे आ. कुमार आयलानी, शिवसेनेचे कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, उल्हासनगर शहरप्रमुख राजेंद्र चौधरी धनंजय बोडारे, कल्याण भाजपाचे प्रेमनाथ म्हात्रे, उल्हासनगर भाजपाचे महेश सुखरामनी, मनसेचे कौस्तुभ देसाई, विठूभाई नगरसेवक, नगरसेवक दिलीप गायकवाड, मधूकर मोहफे, महेंद्र जाधव, मोहन सासे, तूकाराम मोहफे, कल्याण पंचायत समितीचे सदस्य भरत गोंधळे, मनसेचे अश्विन भोईर, तसेच म्हारळ, वरप कांबा गावातील अनेक ग्रामपंचायत सदस्य, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नेत्रदीपक असा हा सोहळा झाल्याचे अनेक नागरिकांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

श्री पाणबुडी देवी कलामंच ( मुंबई ) प्रस्तुत व शिवप्रेमी महालक्ष्मी गावडेवाडी मंडळ ( कळंबट ) आयोजित नमन प्रयोगाचे आयोजन !

श्री पाणबुडी देवी कलामंच ( मुंबई ) प्रस्तुत व शिवप्रेमी महालक्ष्मी गावडेवाडी मंडळ ( कळंबट ) आयोजित नमन प्रयोगाचे आयोजन ! कोकण सुपुत्र लाडका ...