Wednesday, 8 September 2021

गणेशोत्सव पार्श्वभूमीवर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहनांचा महापूर !! 'उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील, पो. नि. अश्वनाथ खेडकर व वाहतूक पोलीसांचे उल्लेखनीय वाहतूक सुनियोजन'

गणेशोत्सव पार्श्वभूमीवर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहनांचा महापूर !!

'उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील, पो. नि. अश्वनाथ खेडकर व वाहतूक पोलीसांचे उल्लेखनीय वाहतूक सुनियोजन'
 
   
      बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : आगामी गणेशोत्सव सणा निमित्ताने मुंबई, ठाणे, गुजरात आदी शहरातून कोकणातील आपापल्या गावाकडे जाण्यासाठी चाकरमानी मोठया प्रमाणात येवू लागले आहेत. त्या अनुषंगाने या सर्व चाकरमान्यांचा प्रवास सुरक्षित आणि सुखकर व्हावा यासाठी रायगड जिल्हा वाहतूक पोलिसांनी वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी जय्यत तयारी केली आहे.
      मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गावर माणगांव या शहरात महामार्गाच्या दोन्ही बाजूने बाजारपेठ असल्याने स्थानिक जनता खरेदीसाठी सतत गर्दी करत असते. तसेच माणगांव शहराच्या मध्यवर्ती भागात बस स्थानक / आगार असल्याने या ठिकाणी येणाऱ्या एसटी बसेस चा माणगांव शहरामधील मधील वाहतूकीवर  मोठया प्रमाणात परिणाम होत असतो या अनुषंगाने माणगांव उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रवीण पाटील व माणगांव पोलीस निरीक्षक श्री अश्वनाथ खेडकर आणि महाड विभागाचे वाहतूक पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली माणगांव वाहतूक शाखेचे वाहतूक पोलीस श्री. लालासाहेब वाघमोडे, श्री. साबळे व त्यांचे इतर वाहतूक पोलीस सहकारी यांनी वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या आहेत. माणगांव बाजारपेठे मध्ये बॅरिकेट्स लावल्याने वाहतूक सुरळीत राहण्यास मदत होणार आहे. राष्ट्रीय महामार्गावर तसेच पर्यायी मार्गावर जागोजागी दिशा दर्शक फलक लावण्यात आले आहेत. तसेच महामार्गावर अपघात झाल्यास  जखमींना तात्काळ उपचार मिळण्यासाठी २४ तास अंबुलन्स सुविधा तयार ठेवली आहे. तसेच हायड्रा, क्रेन, इत्यादी २४ तास माणगाव वाहतूक चौकी येथे उपलब्ध आहे.यामुळे गणेशोत्सवा करीता कोकणात  येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित होण्यासाठी माणगाव वाहतूक पोलीस व त्यांचे मदतीला बाहेरून बांदोबस्ता करिता आलेले अधिकारी व कर्मचारी महामार्गावर ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता २४ तास जीवाचे रान करताना दिसून येत आहेत. त्यामुळे पोलिसांनी केलेल्या योग्य आणि उल्लेखनीय वाहतूक  नियोजनामुळे चाकरमान्यांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित होण्यास मदत होणार आहे.

No comments:

Post a Comment

श्री पाणबुडी देवी कलामंच ( मुंबई ) प्रस्तुत व शिवप्रेमी महालक्ष्मी गावडेवाडी मंडळ ( कळंबट ) आयोजित नमन प्रयोगाचे आयोजन !

श्री पाणबुडी देवी कलामंच ( मुंबई ) प्रस्तुत व शिवप्रेमी महालक्ष्मी गावडेवाडी मंडळ ( कळंबट ) आयोजित नमन प्रयोगाचे आयोजन ! कोकण सुपुत्र लाडका ...