Wednesday, 8 September 2021

कल्याण पंचायत समिती झाली चकाचक, नवनियुक्त गटविकास अधिकाऱ्याची कडक सूचना !!

कल्याण पंचायत समिती झाली चकाचक, नवनियुक्त गटविकास अधिकाऱ्याची कडक सूचना !!


कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी म्हणून कार्यभार स्विकारताच कल्याण पंचायत समिती अगदी चकाचक झाली. तसेच पहिल्याच ग्रामसेवकांच्या मिंटिंग मध्ये सगळ्याना 'कडक'अश्या सूचना दिल्या. 


त्यामुळे आता नांगरीकांची कामे लालफितीत अडकणार नाही अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. तालुक्याचे विकास केंद्र म्हणून पंचायत समिती कडे पाहिले जाते, त्यातल्या त्यात कल्याण पंचायत समितीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. कारण या पंचायत समितीच्या हद्दीत शहरी व ग्रामीण असे दोन्ही भाग येतात. या पंचायत समितीशी डझनभर लोकप्रतिनिधीचा संबंध येत असताना ही नवीन इमारत काय होऊ शकली नाही.


१९८४ मध्ये अल्प बचत प्रोत्साहनालय अनुदानातून बांधलेले या इमारतीची डागडुजी व रंगरंगोटी करून येथेच सर्व विभागाचे कार्यालय थाटली आहेत. तत्कालीन महसूलमंत्री शांताराम घोलप यांच्या हस्ते या इमारतीचे उद्घाटन झाले होते. शेजारीच असलेली धोकादायक इमारत पाडल्यानंतर येथे पार्किंंग करण्यात आले आहे.


या अगोदर पंचायत समिती म्हणजे घाणीचे साम्राज्य अशी काहीशी ओळख असलेल्या या इमारतीचे कोपरे पान, गुटखा तंबाखू, दारूच्या रिकाम्या बाटल्या, यामुळे उठून दिसत होते, पाय-यावर भटकी कुत्री, त्यांची विष्ठा, माती, धूळ, कचरा साफसफाई, सभागृहातील कोपऱ्यात रिकाम्या बाटल्या, वरती शेडमध्ये अस्तावेस्त पडलेले भंगार यामुळे पंचायत समिती आहे की भंगार गोडाऊन अशी स्थिती वाटत होती. पिण्याच्या पाण्याची गैरसोय, शौचालयाचा अभाव, आदी अडचणी आहेच, अशातच कर्मचाऱ्यांवर नसलेले निंयत्रण, बंद असलेले विभाग, कर्मचाऱ्याच्या आपसातील कुरघोडी, याचा नागरिकांना होणारा त्रास, अशा बिकट काळात,' रफ अँड टप'अशी ओळख असलेले अशोक भवारी यांची कल्याण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदी वर्णी लागली आहे. 


त्यांनी पदभार स्विकारताच पंचायत समिती चकाचक झाली, वरच्या शेडमध्ये अस्ताव्यस्त पडलेले साहित्य, व्यवस्थित झाले, अनेक दिवसांपासून बंद असलेले बांधकाम विभागाचे कार्यालय उघडे दिसले, इमारतीचे कोपरे, भिंतीवरील नकाशे, पिचकाऱ्या गायब झाल्या, परिसरात स्वच्छता दिसू लागली होती. यातच पहिल्याच ग्रामसेवकांच्या बैठकीत कामचुकार, ग्रामसेवक व कर्मचारी याची गय केली जाणार नाही याची तत्कालीन ग्रामसेविका श्रीमती शिल्पा भोईर यांच्या निंलबनाच्या प्रस्तावावर स्वाक्षरी करून चुणूक दाखवली. तर जन्म मृत्यूचे अहवाल दोन दिवसात देण्याच्या सूचना दिल्या, तसेच ६४ गावाचे अहवाल अद्याप आले नाहीत याबद्ल नाराजी व्यक्त केली. या बैठकीत ग्रामसेवकांना अनेक महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या.

दरम्यान कल्याण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी म्हणून पदभार स्विकारल्या बद्दल जनाधार निर्भीड पत्रकार संघाचे अध्यक्ष पत्रकार संजय कांबळे, सेवानिवृत्त डेप्युटी सीईओ व्ही आर नाईक, पंचायत समितीचे शिपाई राहूल कांबळे व इतर, आदीनी अशोक भवारी यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यामुळे अशा रोखठोक अधिकारी अशोक भवारी यांचा तालुक्याला फायदा होऊन विविध प्रकारची विकास कामे मार्गी लागतील अशी आशा व्यक्त करुया.

No comments:

Post a Comment

नालासोपारात शिवसेनेत महिलांचे जोरदार इनकमिंग..!

नालासोपारात शिवसेनेत महिलांचे जोरदार इनकमिंग..! नालासोपारा, प्रतिनिधी : शिवसेना मुख्य नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी श...