Friday, 24 September 2021

डोंबिवली येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अमानुष अत्याचाराचा निषेध व्यक्त करुन विविध मागण्यांचे अन्याय अत्याचार निर्मुलन समितीचे शासनास निवेदन...!

डोंबिवली येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अमानुष अत्याचाराचा निषेध व्यक्त करुन विविध मागण्यांचे अन्याय अत्याचार निर्मुलन समितीचे शासनास निवेदन...!


कल्याण (प्रतिनिधी) - डोंबिवली येथील अल्पवयीन मुलीवर झालेला सामुहिक बलात्कार पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटनाअसुन संपुर्ण देशातील ही सर्वात मोठी धक्कादायक घटना आहे. 


सदर घटनेचा अन्याय अत्याचार निर्मुलन समिती, महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेने जाहीर निषेध व्यक्त करुन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविंद्रदादा जाधव आणि कार्याध्यक्ष डॉ. रमेश सावंत यांच्या मार्गदर्शनाने संघटनेचे प्रदेश सरचिटणीस महेंद्र तथा अण्णासाहेब पंडीत यांचे नेतृत्वाखाली संघटनेच्या शिष्टमंडळाने कल्याणचे तहसीलदार विजय पाटील यांची भेट घेऊन शासनास निवेदन सादर केले आहे. सदर निवेदनाद्वारे अमानुष घटनेचा निषेध व्यक्त करुन आरोपींना कठोर शिक्षेच्या मागणी सह पिडीत मुलीच्या पुनर्वसनाची मागणी करण्यात आली आहे. 


तसेच पिडीत मुलीला अमली पदार्थ व मादक द्रव्य ही दिले गेले होते अशी माहिती समोर येत आहे म्हणून मादक द्रव्य व अमली पदार्थ विकणा-यांचा शोध घेऊन त्यांचेवर कारवाई करण्याचे आदेश शासनाने पोलीस प्रशासनाला द्यावेत अशी ही मागणी अन्याय अत्याचार निर्मुलन समितीच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. अण्णा पंडीत यांचे नेतृत्वाखाली तहसीलदारांची भेट घेतलेल्या शिष्टमंडळात संघटनेचे ठाणे जिल्हा सरचिटणीस सुनील वाघ, मुंब्रा शहर अध्यक्ष राजु दोंदे,भुजंग साळवे, राजेंद्र पराड, गणेश हरीनामे इत्यादी पदाधिकारी हजर होते.



No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !!

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !! ...