Friday, 3 September 2021

कल्याण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी म्हणून अशोक भवारी यांची नियुक्ती, तालुक्याचे कल्याण होणार?

कल्याण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी म्हणून अशोक भवारी यांची नियुक्ती, तालुक्याचे कल्याण होणार?


कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण पंचायत समितीच्या तत्कालीन बीडीओ श्रीमती श्वेता पालवे यांची विक्रमगड पंचायत समिती येथे बदली झाल्यानें रिक्त झालेल्या कल्याण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदी अपेक्षेप्रमाणे शहापूर पंचायत समितीचे बीडीओ अशोक मंगलदास भवारी यांची नियुक्ती करण्यात आली असून ते 'रफ अँड टप' गटविकास अधिकारी म्हणून ओळखत असल्याने आता तालुक्याचे 'कल्याण' होणार का?असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.


कल्याण पंचायत समिती वर सध्या शिवसेनेचे सभापती व उपसभापती विराजमान असले तरी उपसभापती हे भाजपाच्या व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आशीर्वादाचे 'किरन' आहे. एकूण १२ सदस्य असलेल्या या पंचायत समिती मध्ये भाजपाचे ५, शिवसेना ४ आणि राष्ट्रवादी काँग्रेस ३ असे पक्षीय बलाबल आहे. तत्कालीन गटविकास अधिकारी श्रीमती श्वेता पालवे यांच्या कार्यकाळात सदस्य आणि बीडीओ यांच्यात अनेकवेळा खटके उडाले होते. याचे पडसाद सदस्यांच्या मासिक मिंटिंग मध्ये दिसून आले होते. सदस्य आणि बीडीओ यांच्या मध्ये कमालीचा वाद होता. तो विकोपाला गेला होता. आमदार किसन कथोरे, जिल्हा परिषदेचे सीईओ यांच्याकडे तक्रारी ही झाल्या होत्या. पण तरीही त्यांच्याच कार्यकाळात कल्याण पंचायत समिती ची इमारत दुरुस्ती झाली, रंगरंगोटी झाली, पंतप्रधान महाआवास योजनेत कल्याण तालुक्याला राज्यात प्रथम क्रमांक मिळाला होता, तसेच वरप येथे कोरोना कोविड केअर सेंटर देखील सुरू झाले. हे नाकारुन चालणार नाही.

ग्रामसेवकांच्या तक्रारी, यावरून होणारे वाद, विविध विकास कामांचा प्रश्न, कर्मचाऱ्यांवरील नियंत्रणाचा अभाव, प्रंसगी कठोर व कणखर निर्णय घेण्यात चालढकलपणा,गावा गावातील रस्ते, गटारे, कचऱ्यांचे तेच ते प्रश्न, सदस्यांमधील मतभेद याचा पंचायत समितीच्या कामकाजावर होणारा परिणाम, पंचायत समिती मधील सर्व विभागाचे प्रमुख व बीडीओ यांच्यातील समन्वय ,पंचायत समितीच्या प्रशासनातील काही हलक्या 'कानाचे नारदमुनी' आदी विविध अडचणी, समस्या, प्रश्न यांचे भिजत घोंगडे, हे नवीन गटविकास अधिकारी यांच्या समोर आव्हान ठरणार आहे.

असे असले तरी शहापूर पंचायत समिती वरून आलेले अशोक भवारी हे रोखठोक स्वभावाबद्दल परिसरात परिचित आहेत. त्यांच्या या स्वभावामुळे व काही गैरसमजुती मुळे शहापूर पंचायत समितीच्या सदस्यांनी त्यांच्या बदलीसाठी उपोषण केले होते. काही काळ ते 'वादग्रस्त' गटविकास अधिकारी म्हणून देखील शहापूरात चर्चा होती. त्यामुळे ४ आमदार, २ खासदार, झेडपी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती, उपसभापती, सदस्य, झेडपी सदस्य, विविध पक्षाचे तालुका प्रमुख, असे डझनभर लोकप्रतिनिधी कल्याण तालुक्याशी निगडित असल्याने यामध्ये नवनियुक्त गटविकास अधिकारी अशोक भवारी हे भविष्यात कसे काम करतात यावर तालुक्याचे कल्याण किंवा अकल्याण होणार आहे.

प्रतिक्रिया 'नवनियुक्त गटविकास अधिका-यानी सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन काम करावे, कामचुकारावर वेळीच कारवाई करावी, नागरीकांचे प्रश्न त्वरित सोडवावेत, मग तक्रारींंचा प्रश्न येणार नाही, आमचे पुर्ण सहकार्य लाभेल.- किरण ठोंबरे (उपसभापती, कल्याण पंचायत समिती)

No comments:

Post a Comment

आंगवली येथील श्री मार्लेश्वराचा १२ जानेवारीपासून यात्रोत्सवाला सुरुवात !

आंगवली येथील श्री मार्लेश्वराचा १२ जानेवारीपासून यात्रोत्सवाला सुरुवात ! ** श्री मार्लेश्वर देवस्थान रिलिजस अँण्ड चॅरिटेबल ट्रस्ट, आंगवलीतर्...