Friday, 3 September 2021

म्हारळ, वरप,कांबा गावाच्या विकासासाठी आणि प्रश्न सोडविण्यासाठी दोन्ही आमदार सरसावले, मंडळ अध्यक्षाचा पुढाकार !!

म्हारळ, वरप,कांबा गावाच्या विकासासाठी आणि प्रश्न सोडविण्यासाठी दोन्ही आमदार सरसावले, मंडळ अध्यक्षाचा पुढाकार !!


कल्याण, (संजय कांबळे) : गेली कित्येक वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेल्या कल्याण तालुक्यातील पण उल्हासनगर विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेली म्हारळ, वरप, कांबा या गावांचा सर्वागीण विकास करण्यासाठी तसेच येथील प्रश्न, अडचणी, समस्या सोडवण्यासाठी कार्यसम्राट आमदार किसन कथोरे आणि कुमार आयलानी यांनी अधिकारी व या गावचे ग्रामस्थ व ग्रामसेवक याची नुकतीच एक बैठक आयोजित केली होती. त्यामुळे आता तरी नागरिकांचे प्रश्न सुटतील अशी आशा बाळगायला काही हरकत नाही.


उल्हासनगर विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या कल्याण तालुक्यातील म्हारळ, वरप, कांबा या गावाची खूपच वाईट स्थिती आहे. कल्याण मुरबाड महामार्गावर तसेच उल्हासनगर, कल्याण, अंबरनाथ, टिटवाळा अशा मोठ्या शहराला लागून ही गावे वसल्याने या परिसराचे झपाट्याने नागरीकरण झाले आहे. नियोजन शुन्य बाधकांमे ,जेथें जागा मिळेल तेथे चाळी उभ्या राहिल्या मुळे आज मुलभूत सोईसुविधा पुरवताना ग्रामपंचायतीला घाम फुटत आहे. एकट्या म्हारळ गावाची लोकसंख्या एक लाखांच्या आसपास गेली आहे,यांच्या पावलावर पाऊल ठेवून शेजारील वरप,कांबा ही गावे वाटचाल करीत आहे. कचरा, गटारे, सांडपाणी, रस्ते, असे प्रश्न वर्षानुवर्षे तसेच आहेत. कांबा गावाला तर शुद्ध पाणी मिळत नाही ही शोकांतिका आहे.


बिल्डर मंडळी ने जागोजागी मातीचे भराव केल्याने, नैसर्गिक गटारे बंद केल्याने, त्यांचे मार्ग बदल्याने आज प्रत्येक वेळी या तिन्ही गावांना पुराच्या पाण्याचा फटका बसत आहे. जी अवस्था रस्ते, गटारे, कचरा याची तशीच व्यथा आरोग्याची,येथे आरोग्य उपकेंद्र नसल्यामुळे येथील नागरिकांना दहागाव प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा गोवेली ग्रामीण रुग्णालय तेथे जावे लागत आहे. यां गावाचे दुर्दैव असे की येथील सरपंच, सदस्य, नागरिक यांच्या त एकमत, समन्वय नसल्याने येथील आमदार व इतर लोकप्रतिनिधी यांनी सोईस्कर दुर्लक्ष केले होते.

पण अलीकडच्या काळात म्हारळ ग्रामपंचायतीचे सदस्य व या तिन्ही गावचे भाजपाचे मंडळ अध्यक्ष योगेश देशमुख यांनी आमदार कुमार आयलानी यांच्या सतत पाठीमागे लागून या गावाकडे लक्ष देण्यास सांगितले. त्या नुसार मागील महिन्यात कुमार आयलानी यांनी या भागाचा दौरा केला व अडचणी जाणून घेतल्या, याचाच एक भाग म्हणून मुरबाड विधान सभा मतदारसंघांचे कार्यसम्राट आमदार किसन कथोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार कुमार आयलानी यांच्या कार्यालयात विविध अधिकारी, पदाधिकारी, ग्रामसेवक यांच्या उपस्थित एका बैठकीचे आयोजन केले होते.

यामध्ये गावातील रोड सिंमेट काँक्रीटीकरण, आरोग्य केंद्र साठी जागा, कचरा डंम्पिंग, गटार व्यवस्था, वीज समस्या, पुरग्रस्तांंना मदत, कल्याण मुरबाड हायवेवर राहिलेली कामे, आदी बाबतीत चर्चा करून ते प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. 

या बैठकीला कल्याण पंचायत समितीचेप्रभारी गटविकास अधिकारी परदेशी, सर्व विभागाचे प्रमुख, तिन्ही गावचे ग्रामसेवक, भाजपचे महेश सुखरामनी, झेडपी सदस्या वैशाली शिंदे, माझी सरपंच प्रमोद देशमुख, पंचायत समितीचे सदस्य पांडुरंग म्हात्रे, रंजना देशमुख, अमृता देशमुख, अस्मिता जाधव, समाजसेवक महेश देशमुख, केतन देशमुख, बाळकृष्ण देशमुख,वरपच्या सरपंच छाया भोईर, राजेश भोईर व भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

आंगवली येथील श्री मार्लेश्वराचा १२ जानेवारीपासून यात्रोत्सवाला सुरुवात !

आंगवली येथील श्री मार्लेश्वराचा १२ जानेवारीपासून यात्रोत्सवाला सुरुवात ! ** श्री मार्लेश्वर देवस्थान रिलिजस अँण्ड चॅरिटेबल ट्रस्ट, आंगवलीतर्...