Friday, 3 September 2021

तळा तालुका शेकापच्या वतीने पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे यांचे स्वागत !!

तळा तालुका शेकापच्या वतीने पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे यांचे स्वागत !!


     बोरघर / माणगांव, ( विश्वास गायकवाड ) : रायगड जिल्ह्यातील तळा तालुका पोलीस ठाण्याचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे यांचे तळा तालुका शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने शेतकरी कामगार  पक्षाचे तळा तालुका सरचिटणीस धनराज गायकवाड आणि युवा नेते लहुशेठ चव्हाण यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
      अलिकडेच पोलीस खात्यातील पोलीस निरीक्षक यांच्या झालेल्या बदल्यांच्या प्रक्रियेत पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे यांची रायगड जिल्ह्यातील तळा तालुका पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. जनमानसात किंबहुना कोणत्याही शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस आणि जनता यांच्या मधील समन्वय अत्यंत महत्त्वाचा असतो. 
    जनतेच्या रक्षणासाठी, हितासाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलीसांप्रती जनतेच्या मनात नितांत आदर , सद्भावना आणि समन्वय अपरिहार्य असते. या पार्श्वभूमीवर तळा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती झालेल्या पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे यांची तळा शेकापचे सरचिटणीस धनराज गायकवाड यांनी त्यांची तळा पोलीस ठाण्यात जाऊन भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे शेकापच्या वतीने सहर्ष स्वागत केले.

No comments:

Post a Comment

धम्माल विनोदी नाटक "वरचा मजला रिकामा" रंगमंचावर ...

धम्माल विनोदी नाटक "वरचा मजला रिकामा" रंगमंचावर ... ** १२ जानेवारी २०२५ रोजी रात्रौ.ठिक ७:३० वाजता साहित्य संघ नाट्यगृह चर्नीरोड य...