Friday, 10 January 2025

धम्माल विनोदी नाटक "वरचा मजला रिकामा" रंगमंचावर ...

धम्माल विनोदी नाटक "वरचा मजला रिकामा" रंगमंचावर ...

** १२ जानेवारी २०२५ रोजी रात्रौ.ठिक ७:३० वाजता साहित्य संघ नाट्यगृह चर्नीरोड येथे होणार सादरीकरण  

मुंबई - ( शांताराम गुडेकर /दिपक कारकर )

             ९ रंग कलामंच मुंबई गेले अनेक वर्षा पासुन कार्यरत असणारी संस्था पुन्हा एकदा धम्माल विनोदी नाट्यकृती वरचा मजला रिकामा रंगमंचावर घेऊन येत आहे. या नाटकाचे लेखन कै. आत्माराम सावंत तसेच दिग्दर्शन सागर नांदळजकर यांनी केले आहे. प्रविण सावंत आणि सचिन शिंदे यानी या नाटकाची निर्मिती केली आहे. सुत्रधार सुनिल बेंडखळे असून राजेद्र गावणंग यांचे संगीत, जयवंत सातोस्करांची रंगभूषा, संदेश वारे यांचे ध्वनी मुद्रण तसेच नृत्य दिग्दर्शन हर्षदा मेस्त्री यांनी केले आहे. रुपेश मांडवकर आणि स्वप्नील पाटील व्यवस्थापनाची धूरा सांभाळली आहे. अनेक नावाजलेले कलाकार या नाटकात आपली भूमिका सादर करणार आहेत सदर नाट्यप्रयोग अनाथ आश्रमातील मुलांच्या मदत निधीसाठी होत आहे, तरी सर्वानी रविवार दि. १२ जानेवारी २०२५ रोजी रात्रौ. ठिक ७:३० वाजता साहित्य संघ नाट्यगृह चर्नीरोड येथे या प्रयोगाला मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन दिग्दर्शक सागर नांदळजकर यांच्या तर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी - ९७०२५५६५३३ ह्या भ्रमणध्वनी वरती संपर्क साधावा.

No comments:

Post a Comment

धम्माल विनोदी नाटक "वरचा मजला रिकामा" रंगमंचावर ...

धम्माल विनोदी नाटक "वरचा मजला रिकामा" रंगमंचावर ... ** १२ जानेवारी २०२५ रोजी रात्रौ.ठिक ७:३० वाजता साहित्य संघ नाट्यगृह चर्नीरोड य...