१२ जानेवारी रोजी कुणबी समाजोन्नती संघ चिपळूण शाखेच्या वतीने युवकांना शेतीविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन !
प्रतिनिधी - निलेश कोकमकर
तरुणांनी व्यवसायाकडे आणि त्यातच बरोबर व्यावसायिक शेतीकडे वळलेले पाहिजे आणि हि येणाऱ्या काळाची गरज आहे. हे ओळखून प्रत्येकाने ह्या व्यवसायाबद्दल माहिती घेतली पाहिजे त्या हेतूने कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा चिपळूणच्या मार्फत दिनांक १२ जानेवारी २०२५ रोजी तिरुपती ट्रेनिंग सेंटर, दादर पश्चिम येथे दुपारी २. ३० ते सायं. ५. ३० वा पर्यंत शेतीविषयक मार्गदर्शन आणि दिनदर्शिका २०२५ प्रकाशन सोहळा असे आयोजन करण्यात आले आहे.
शेती विषयक मार्गदर्शन ( शेतकरी उत्पादक संघटना - FPO ) ह्या शिबिरात प्रमुख मार्गदर्शक म्हणून संगमेश्वर तालुका ऍग्रोस्टार फार्मफ्रेश प्रोडयुसर कं लि.चे संचालक प्रमोद शेलार उपस्थित राहणार आहेत. ह्या शिबिरात शेतकरी उत्पादक कंपनी बनविण्यामागील केंद्र सरकारचे उद्दीष्ट आणि त्या मागील आर्थिक व व्यावसायिक फायदे, शेतकरी उत्पादक कंपनी मध्ये गुंतवणुकीचे फायदे, तसेच शेती आधारित उद्योगधंद्यामधील उपलब्ध संधी अशा महत्वाच्या मुद्यांवर संबोधित करणार आहेत. हे शिबीरासाठी सचिन बुदर, शरद बोबले यांच्या विशेष सहकार्यातून संपन्न होणार आहे. मार्गदर्शन शिबीर आणि दिनदर्शिका प्रकाशन सोहळा यशस्वी करण्यासाठी व्यवस्थापक अनिल पेंढारे, सचिन काटकर ,विवेक आग्रे, किशोर शिगवण, संजय जावळे, सुनिल निर्मळ, सचिन मोरे, बारकू बेंडळ, सचिन कुळे, निलेश पवार त्याच बरोबर तालुका शाखेचे सर्व पदाधिकारी, सदस्य मेहनत घेत आहेत. या कार्यक्रमासाठी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शाखेचे अध्यक्ष चंद्रकांत कोकमकर, सचिव रणजित वरवटकर, खजिनदार अमय खापरे यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment