भिवंडीच्या " दादूसला " बिग बॉसच्या चावडीवर मांजरेकरांनी दिली शाब्बासकी. !!
भिवंडी, दिं,26, अरुण पाटील (कोपर) :
बहुचर्चित 'बिग बॉस' हा अत्यंत लोकप्रिय आणि तितकाच विवादित शो म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्राच्या प्रेक्षकांचा लाडका 'बिग बॉस मराठी' शोला १९ ऑक्टोबर पासून सुरुवात झाली आहे. या शोचा पहिला आठवडा अलमोस्ट पार पडला आहे. घरामध्ये पहिल्याच दिवसापासून राडे होताना दिसून आले. अनेकांनी टास्क दरम्यान एकमेकांशी पंगा घेतला तर अनेकांनी घरातील इतर गोष्टींवरून. यातील एक स्पर्धक पहिल्याच दिवसापासून घरात राडे घालताना दिसून येत आहे. ही स्पर्धक म्हणजे अभिनेत्री मीरा जग्गनाथ होय. मीराने पहिल्याच दिवशी जय दुधानेसोबत टॉवेलवरून वाद घातला होता. तर दुसऱ्या दिवशी स्नेहा वाघशी जेवणावरून राडा केला होता. दरम्यान शो मध्ये सर्वात खराब आचारीच्या टास्कमध्ये अनेक लोकांना मीरा चुकीची वाटली.
याच टास्क वरून काल महेश मांजरेकर यांनी मीरा जग्गनाथला चांगलंच झापलं आहे. या टास्कमध्ये अक्षय वाघमारेकडे किचनचा ताबा देण्यात आला होता. यावेळी एखादी बिघडलेली डिश दुसऱ्या स्पर्धकाला खाऊ घालायची होती. दरम्यान मीरा आणि गायत्रीच्या प्लॅनिंगने अक्षयने अतिशय खराब डिश बनवली जे सर्वसामान्य लोकांना खाणं शक्यचं नाही. आणि डिश दुसरा स्पर्धक दादूसला खाऊ घातली. टास्कचा भाग म्हणून दादूसने इतकी खराब डिश खाण्याचं धाडस केलं. मात्र यावेळी मीराने दादूसला प्रोत्साहन देण्याऐवजी त्याचा टास्क कसा खराब झाला यावर लक्ष देण्यास उकसवलं. हेच सर्व प्रेक्षकांना खटकलं. या कारणावरून महेश यांनी मीराला खडेबोल सुनावले. तसेच दुसऱ्यांचं न ऐकता पुढे बोलणाऱ्या मीराला इतरांचं आधी ऐकून घेत जा असा सल्ला देत भिवंडीच्या " दादूसला "शाब्बासकी दिली.
कालच्या एपिसोडमध्ये महेश मांजरेकर यांनी सर्व स्पर्धकांची शाळा घेतली आहे. कोण कुठे चुकला नि कोण कुठे योग्य होता, हे होस्ट महेश मांजरेकर यांनी बिग बॉसच्या चावडीवर दाखवून दिलं आहे. दरम्यान महेश यांनी गायत्री दातारला मीराच्या मागे न फिरत स्वतःचा खेळ खेळण्याचा सल्लाही देऊन टाकला आहे. बिग बॉस मराठीचा पहिला आठवडा जितका तुफानी होता. तितकाच विकेंड वारसुद्धा धमाकेदार होता. यानंतर स्पर्धकांचा डाव कसा असणार हे पाहणं महत्वाचं ठरेल.
No comments:
Post a Comment