24 सप्टेंबरला आशा अंगणवाडी सीआरपी कर्मचाऱ्यांचा जळगावला जोरदार धरणे व निदर्शने !!
चोपडा ..महाराष्ट्र राज्य आयटक व इतर संघटनांचे कृती समिती तर्फे आज 24 सप्टेंबरला राज्यव्यापी एकजुटीच्या संप करण्यात आला त्या नुसार जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शासनाच्या कामगार विरोधी धोरणाविरुद्ध व इतर मागण्यांसाठी आयटक संघटनेतर्फे जोरदार आंदोलन करण्यात आले.
आंदोलनाचे नेतृत्व 'राज्य उपाध्यक्ष, अमृत महाजन', 'प्रेमलता पाटील, सुमित्रा बोरसे, शारदा पाटील, नंदा वाणी, प्रतिभा पाटील, प्रतिभा जावळे,' आदींनी केले याबाबत सविस्तर वृत्त जळगाव जिल्ह्यातील 'अंगणवाडी कर्मचारी', 'आशा व गटप्रवर्तक कर्मचारी' व 'महाराष्ट्र राज्य जीवन उन्नती अभियान कर्मचारी', 'सी आर पी, एफ एल सी, आर पी सखी' या कर्मचाऱ्यांचा जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर दिनांक 24 सप्टेंबर रोजी सकाळी 12 ते 3 वाजता धरणे आंदोलन करण्यात आले.
त्यावेळी मोदी सरकारच्या कामगारविरोधी धोरणाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली सर्व कर्मचाऱ्यांना कायम सरकारी नोकरी नोकरी सांभाळून घ्यावी किमान एक हजार रुपये पगार व पाच हजार रुपये दहा हजार रुपये पेन्शन द्यावी तसेच कोबी जोखीम मत्ता दहा लाख रुपये द्यावा योद्धा मयत कोरोनाबाधितांना 'पन्नास लाख रुपये विमा कवच' लाभ त्वरित द्यावा सी आर पी, एफ एल सी आर पी व सर्व प्रकारच्या सखी यांच्या मानधनात सहाशे ते बाराशे रुपये निर्दयपणे केली जाणारी कपात बंद करा. कामगार विरोधी कामगार सहिता रद्द करा आदी मागण्यांचे सह विविध योजना काम करणाऱ्या या सर्व कर्मचाऱ्यांना किमान एकवीस हजार रुपये पगार. 10 हजार रुपये पेन्शन, अंगणवाडी आशा, सी आर पी, एफ एल सी, आर पी व सर्व सखी कर्मचाऱ्यांना नवीन मोबाईल आशांना मोबाईल गत प्रवर्तक यांना लॅपटॉप द्या तसेच आशा कर्मचाऱ्यांचे एप्रिल 21 पासून ची रखडलेली मानधनवाढ आणि कोविड भत्ता मिळावा सी आर पी/ एफ एल सी आर पी या कर्मचाऱ्यांचा या सर्व स्किम कर्मचारी व योजना त कार्यरत कर्मचाऱ्यांना नोकरीत कायम करण्यात यावे सरकारी नोकरीत सामावून घ्या तसेच कोवीड जोखीम मत्ता दहा लाख रुपये द्यावा मयत कोरॉनायोद्धाचे वारसांना '50 लाख रुपये विमा कवच' लाभ त्वरित द्यावा सी आर पी, एफ एल सी, आर पी व सर्व प्रकारच्या सखी यांच्या मानधनात सहाशे ते बाराशे रुपये निर्दयपणे केली जाणारी कपात बंद करा. कामगार विरोधी कामगार सहिता रद्द करा आदी 31 मागण्यांचे निवेदन आवाहन आयटक चे जिल्हाध्यक्ष अमृत महाजन प्रेमलता पाटील, सुमित्रा बोरसे, शारदा पाटील, आशा संघटनेचे सुलोचना साबळे, प्रतिभा पाटील, मालू नरवाडे, वंदना कोळी, उमेद जीवन, उन्नती अभियान कर्मचारी संघटनेच्या प्रतिभा जावळे, प्रतिभा वराडे, आदींचे शिष्टमंडळाने दुपारी दोन वाजता मोर्चाचे निवेदन उपजिल्हाधिकारी साहेब यांना दिले त्यात एकूण 31 मागण्या होत्या..
*स्थानिक मागण्यांवर जळगाव जिल्हा परिषद बाल कल्याण विभाग आरोग्य विभाग तसेच उमेद जिल्हा कार्यालय कार्यवाही करेल यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय पाठपुरावा करेल.. असे आश्वासन श्री. उपजिल्हाधिकारी यांनी दिले या धरणे आंदोलनात उषा सपकाळे, सुरेखा शिंदे, सूनंदा तायडे, सुरेखा पाटील नुरुंनी सा हिपाजत अली ,सुनिता राजपूत प्रतिभा गाडेकर, अलका पाटील, कविता सोनवणे, सरला पाटील, कलाबाई देवराज, प्रतीभा पाटील, मीनाक्षी पाटील, शितल बोराडे, आरती कुलकर्णी, सुनिता ठोंबरे, निर्मला माळी, प्रतिभा पर्देशी, लक्ष्मी वानखेडे, शारदा पाटील, नंदा वाणी, ममता महाजन, वंदना पाटील, प्रतिभा जावळे, कांचन सुरवाडे, लक्ष्मी वानखेडे, हिराबाई महाले, प्रीती वराडे चारुलता पाटील, साधने धांडे, रेखा जमदले, माया रानित, मनीषा इंगळे, सुनंदा पाटील, भगतसिंग पाटील, आत्माराम पाटील, गरताड, नाना, पाटील आदी 200 अंगणवाडी सेविका मदतनीस, आशा गटप्रवर्तक, सीआरपि, आरोग्य ..कृषी सखी जळगाव चोपडा जामनेर धरणगाव पाचोरा यावल भुसावल तालुक्यातून उपस्थित होते. सर्व कामगार संघटनांतर्फे आयोजित 24 सप्टेंबर देशव्यापी योजना कर्मचाऱ्यांच्या संपात आयटक प्रणीत अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आशा व गटप्रवर्तक संघटना आणि महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियान कर्मचारी संघटना यांनी चांगला सहभाग नोंदवला याबद्दल आयटकचे 'राज्य उपाध्यक्ष अमृत महाजन' यांनी धन्यवाद दिले आहेत.
No comments:
Post a Comment