Saturday, 25 September 2021

ठाणे जिल्हातील खेळाडू चे राष्ट्रीय स्पर्धेमध्ये घवघवीत यश....!

ठाणे जिल्हातील खेळाडू चे राष्ट्रीय स्पर्धेमध्ये घवघवीत यश....!


कल्याण :- 
नुकत्याच हरियाणा (रोहतक) येथे स्टुडन्ट ओलंपिक असोसिएशन ऑफ इंडिया व स्टुडन्ट ओलंपिक असोसिएशन हरियाणा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या 7 व्या स्टुडंट्स ओलंपिक नॅशनल स्पर्धेमध्ये ठाणे जिल्ह्यातील  अथलेटिक्स, फुटबॉल, योगा व कॅरम मधील 60 खेळाडू सहभागी होऊन घवघवीत यश संपादन केले..या स्पर्धेत देशातील 17 राज्य मधील 900 खेळाडूंनी सहभाग घेतला होता करोणा काळ सुरू झाल्यानंतरची ही पहिलीच स्पर्धा असल्यामुळे स्पर्धेला एक वेगळेच महत्त्व प्राप्त झाले होते. ठाणे जिल्ह्यातील खेळाडूंची कामगिरी खालील प्रमाणे


"अथलेटिक्स" या खेळा मध्ये :

मुलांन मध्ये 12 वर्षाखालील गटात ;
'आलोक आव्हाड- कल्याण  100 / 200 मी. धावणे व लाँग जंप मध्ये सुवर्ण पदक', 'प्रसाद गायधनी, कल्याण 200 मी. धावणे रौप्य पदक', 'आस्था काळदाते- कल्याण लाँगजंप व 100 मीटर धावणे  सुवर्ण पदक पटकावले'


14 वर्षाखालील गटात ;
'अथर्व महाडिक कल्याण 100/400/800 मी. धावणे' यामध्ये सुवर्ण पदक पटकावले, 'जिया आलिया बिजु - डोंबिवली 100 मी. धावणे रौप्य पदक तर 200 मीटर धावणे सुवर्ण पदक'
'शार्दुला रोटे, तनिष्क मांजी व खुशाल तिवारी सर्व कल्याण गोळा फेक सुवर्णपदक', 'प्राप्ती शेट्टी - डोंबिवली 800 मी. धावणे रौप्य पदक", 'गायत्री जोशी- कल्याण 400. मी सुवर्णापदक', '200.मी रौप्य पदक, 17 वर्षाखालील गटात अमन टोले- अंबरनाथ', '1500 मीटर धावणे कास्यपदक अंकित पाल- कल्याण', 400 मी. कास्यपदक, 800. मी. रौप्य पदक हर्शिद निषाद- उल्हासनगर', '100 मी. रौप्य पदक'

22 वर्षाखालील गटात ;
'जयेश चव्हाण- बदलापूर, सुवर्णपदक'
*योगा*

14 वर्षाखालील गटात ;
'प्रसाद गायधनी, कल्याण- सुवर्ण पदक', 'श्रेया शिंदे- डोंबिवली सुवर्ण पदक *कॅरम*'

19 वर्षाखालील गटात ;
'आरती धवन-  कल्याण सुवर्ण पथक', 'बिपिन पांडे - वसई सुवर्णपदक', 'आशुतोष गिरी- नालासोपारा
सुवर्णपदक', 'अविराज आडके- विरार सुवर्णपदक', 'महेश रायकर -  वसई - यांनी रौप्यपदक' पटकावले.. 

या स्पर्धेत सर्व खेळाचे प्रशिक्षक म्हणून शांती माजी, क्रांती रोटे, मुकुंद गायधनी, राजू सुतार, अरुण कांजीलाल, पर्थ दिवेदी, विलास भावे, यांनी परिश्रम घेतले.. स्टुडंट्स ओलंपिक असोसिएशन ठाणे जिल्ह्यात गेल्या 7 वर्षा पासून कार्यरत असून शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी काम करत आहे.यापुढे ही नोव्हे.डिसेंबर मध्ये आठव्या स्टुडंट्स ओलंपिक स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. यात जास्तीत जास्त जिल्ह्यातील खेळाडूंनी सहभागी व्हावे असे आवाहन स्टुडंट्स ओलंपिक असोसिएशन ठाणे जिल्ह्याच्या वतीने करण्यात आले आहे.
-------------

- अविनाश ओंबासे
9820991450

No comments:

Post a Comment

शिवस्मारक समिती संस्थापक/अध्यक्ष शिवभक्त संजय दादा भालेराव यांच्या नेतृत्वाखाली घाटकोपर मध्ये शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा !

शिवस्मारक समिती संस्थापक/अध्यक्ष शिवभक्त संजय दादा भालेराव यांच्या नेतृत्वाखाली घाटकोपर मध्ये शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा !  ** अवघे व...