Saturday, 25 September 2021

डोंबिवली येथील सामुहिक अत्याचार प्रकरणी समविचारी राजकीय व सामाजिक संघटनांची एल्गार बैठक संपन्न.. !

डोंबिवली येथील सामुहिक अत्याचार प्रकरणी समविचारी  राजकीय व सामाजिक संघटनांची एल्गार बैठक संपन्न.. !


डोंबिवली, (प्रतिनिधी) - डोंबिवली येथील अल्पवयीन मुलीवर झालेला अमानुष व अमानविय अत्याचार संपूर्ण देशातील लज्जास्पद व निंदनीय घटना असुन सदर घटनेमुळे देशाची अब्रु वेशीवर टांगली गेली आहे, या गुन्ह्यातील आरोपींना कठोर शासन व्हावे. 


सदर गुन्ह्याचा तपास निपक्ष पणे अनुभवी व कार्यक्षम अधिका-यांमार्फत व्हावा. तसेच पिडीत मुलगी व तिचे कुटुंबियांना न्याय मिळत नाही तो पर्यंत मोफत पोलीस संरक्षण देण्यात यावे. यासह घटनेच्या अनुषंगाने येणा-या अनेक मुद्द्यांवर उहापोह करुन आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी समविचारी सामाजिक संघटनांची एल्गार बैठक "आधार इंडिया, रेतीभवन सभागृह डोंबिवली येथे नुकतीच संपन्न झाली.


अन्याय अत्याचार कृती समितीचे  डॉ. अमीत दुखंडे (प्रदेश संघटक, आजाद हिंद कामगार संघटना) संजय गायकवाड (स्वाभिमानी शिक्षण संघटना) आनंद नवसागरे (रिपब्लिकन सेना, कल्याण-डोंबिवली जिल्हाध्यक्ष) हे प्रमुख निमंत्रक होते. बैठकीच्या प्रमुख उपस्थितांमध्ये जयंत दिवाण, (महाराष्ट्र सर्वोदय मंडळ) महेंद्र तथा अण्णा पंडित. (प्रदेश सरचिटणीस, अन्याय अत्याचार निर्मुलन समिती, महाराष्ट्र राज्य.) अनामिका रमेश महाले (महिला आघाडी ठाणे जिल्हाध्यक्ष, आरपीआय (आंबेडकर)) प्रशांत बनसोडे (कडोंमपा जिल्हा सचिव, आरपीआय (आंबेडकर)) अनंत पारदुले (रिपब्लिकन सेना, 27 गावे विभाग अध्यक्ष) योगीनी पगारे (भिम आर्मी, मुंबई प्रदेश अध्यक्ष) नीता गायकवाड (स्वाभिमानी शिक्षण संघटना, महिला अध्यक्षा) काळू कोमास्कर (लालबावटा युनियन अध्यक्ष) इत्यादी मान्यवरांनी आपले विचार मांडले.
नियोजन समिती मध्ये उज्वला पटेल, दिनेश पुजारी, सुनील चव्हाण, लक्ष्मण कुंजीकरण, गणेश हरीनामे, राजेंद्र शिंदे, पत्रकार रमेश गायकवाड, संदीप घुगे, विलास पाटील, श्रावण पाटील व इतर पदाधिकारी उपस्थित होते.


सदर अत्याचार प्रकरणी  दि. 28 सप्टेंबर 2021 रोजी दुपारी 12 वाजेदरम्यान महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुर्णाकृती पुतळा डोंबिवली (पु) येथे निषेध आंदोलन करण्यात येणार असल्याचे बैठकीत सर्वानुमते ठरविण्यात आले.

No comments:

Post a Comment

शिवस्मारक समिती संस्थापक/अध्यक्ष शिवभक्त संजय दादा भालेराव यांच्या नेतृत्वाखाली घाटकोपर मध्ये शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा !

शिवस्मारक समिती संस्थापक/अध्यक्ष शिवभक्त संजय दादा भालेराव यांच्या नेतृत्वाखाली घाटकोपर मध्ये शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा !  ** अवघे व...