Saturday, 25 September 2021

मोहने येथील शांताराम पाटील शाळा येथे मोफत अँटीजेन आणि आरटी- पीसीआर टेस्ट उपलब्ध !!

मोहने येथील शांताराम पाटील शाळा येथे मोफत अँटीजेन आणि आरटी- पीसीआर टेस्ट उपलब्ध !!

"कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा उपक्रम" 


संदीप शेंडगे, मोहोने : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने मोहोने येथील शांताराम महादु पाटील शाळा यादव नगर येथे मोफत अँटीजेन आणि आरटी- पीसीआर टेस्ट केंद्र सुरू करण्यात आले आहे.


वैद्यकीय अधिकारी डॉ. शोभा साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे केंद्र सुरू असून नागरिकांनी सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी यांसारखी लक्षणे आढळून आल्यास तात्काळ आपली तपासणी करून घ्या अंगावर काढू नका असे आवाहन डॉ. शोभा साबळे यांनी नागरिकांना केले आहे. खाजगी लॅब मध्ये या टेस्ट करिता पाचशे ते सातशे रुपये घेतात परंतु कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेकडून या टेस्ट करिता कोणतेही शुल्क आकारण्यात आलेले नाही. वरील सुविधा मोफत व कोणताही त्रास न होता जलद गतीने मिळतात. तसेच रिपोर्ट तात्काळ उपलब्ध करून दिले जातात. कोव्हीड १९ चे लक्षणे आढळून आल्यास त्या रुग्णाला तात्काळ कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या कोव्हीड सेंटरमध्ये बेड उपलब्ध करून दिला जातो. यासाठी प्रयोगशाळा तंत्रज्ञ रोहन सत्यवान उबाळे आणि कक्ष सेवक आकाश सतीश जावळे हे नागरिकांच्या सेवेकरिता सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सेवा देत आहेत नागरिकांनी खाजगी लॅबमध्ये उगीचच पैसे आणि वेळ वाया घालवू नये. या मोफत सेवेचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.

1 comment:

  1. Very good work from KALYAN DOMBIVALI MUNICIPAL CORPORATION

    ReplyDelete

शिवस्मारक समिती संस्थापक/अध्यक्ष शिवभक्त संजय दादा भालेराव यांच्या नेतृत्वाखाली घाटकोपर मध्ये शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा !

शिवस्मारक समिती संस्थापक/अध्यक्ष शिवभक्त संजय दादा भालेराव यांच्या नेतृत्वाखाली घाटकोपर मध्ये शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा !  ** अवघे व...